Ola Electric scooters : वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे ओला कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे 1,441 युनिट्स परत मागवले आहेत.  ओला इलेक्ट्रिक कंपनीने याबाबत एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की 26 मार्च रोजी वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे आणि प्राथमिक मूल्यांकनात ही एक वेगळी घटना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



प्री-एम्प्टिव्ह उपाय म्हणून त्या विशिष्ट बॅचमधील स्कूटर्सचे तपशीलवार निदान आणि तपासणी करणार आहोत म्हणूनच 1,441 वाहने ऐच्छिक परत मागवत आहोत असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांद्वारे तपासणी केली जाईल आणि सर्व बॅटरी सिस्टम्स, थर्मल सिस्टम्स तसेच सुरक्षा प्रणालींमध्ये सखोल निदान केले जाईल असंही कंपनीने म्हटलं आहे.

ओला गाडीची बॅटरी सिस्टम आधीपासूनच युरोपियन मानक ECE 136 चे पालन करण्यासोबतच भारतासाठी नवीनतम प्रस्तावित मानक AIS 156 चे पालन करुन चाचणी घेते असंही कंपनीने आपल्या जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत, त्यामुळे उत्पादकांना त्यांची वाहने परत मागवायला लागली होती. 


ओकिनावा ऑटोटेक 3,000 हून अधिक युनिट्स परत मागवल्या होत्या, तर Pure EV ने जवळपास 2,000 युनिट्ससाठी असाच प्रयोग केला होता. आगीच्या घटनांमुळे सरकारने तपासणीसाठी एक पॅनेल तयार करण्यास प्रवृत्त केले होते आणि कंपन्यांनी निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास दंड करण्याचा इशारा दिला होता.


महत्वाच्या बातम्या 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI