Maruti Suzuki Upcoming Eeco Van : देशातील सर्वात मोठी ऑटोमेकर कंपनी मारुती सुझुकी या वर्षी सप्टेंबरच्या आसपास भारतीय बाजारपेठेत Eeco व्हॅनचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनी ही कार निर्यातीवर लक्ष देत असून त्यामध्ये दुप्पत नफा मिळवत आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी Eeco ही FY 2022 मध्ये देशातील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. नवीन लूकमध्ये आल्यानंतर विक्रीत वाढ होईल, असा विश्वास कंपनीला आहे. मारुती सुझुकीने गेल्या आर्थिक वर्षात Eeco च्या हजारापेक्षा कमी युनिट्सची निर्यात केली होती, परंतु यावेळी कंपनीने पुन्हा निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच वाहनाच्या निर्यातीत दुपटीने वाढ केली आहे. 


नवीन मॉडेल बाजाराच्या गरजेनुसार असेल


इतर देशांच्या बाजारपेठेत ही व्हॅन लोकप्रिय व्हावी, यासाठी ती नव्या व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाणार आहे. कंपनी त्यात नवीन जनरेशन Eeco सोबत पॉवर स्टीयरिंग वापरणार आहे. याशिवाय, हे स्लाइडिंग दरवाजासह 7-सीटर मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. 


स्पर्धा कोणाशी? 


मारुती सुझुकी व्हॅनने 2010 मध्ये भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा प्रवेश केला होता. लॉन्च झाल्यानंतर 2 वर्षांच्या आत, कंपनीने मॉडेलच्या 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करण्यातही यश मिळवले आहे. 2018 पर्यंत, देशभरात 5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करण्यात ते यशस्वी झाले आहेत. तर, 31 मार्च 2022 दरम्यान इको मॉडेलने भारतीय बाजारपेठेत दरमहा सरासरी साडेनऊ हजार वाहनांची विक्री केली. या व्यतिरिक्त, कंपनी कॉम्पॅक्ट ऑफडोअर 5-डोर सादर करण्याची तयारी करत आहे, जी महिंद्रा थारला (Mahindra Thar) टक्कर देऊ शकते.   


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI