Royal Enfield Hunter 350cc: प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Royal Enfield पुढील महिन्यात आपली नवीन Hunter 350 (Royal Enfield Hunter 350cc) लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाईक जूनमध्येच लॉन्च केली जाऊ शकते. असे मानले जात आहे की, ही हंटर 350 या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाईक असू शकते. कंपनी बऱ्याच दिवसांपासून रॉयल एनफिल्ड हंटरची चाचणी करत होती. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन मजबूत बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहिल्यास तुमचा फायदा होऊ शकतो.   

Meteor 350 आणि नवीन Classic 350 प्रमाणेच हंटर 350 हे अगदी नवीन J प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. यात क्लासिक आणि Meteor प्रमाणेच 349cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन मिळेल. हे इंजिन 20.2bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करू शकते. हंटर 350 6-स्पीड गिअरबॉक्ससह लॉन्च केली जाऊस शकते, अशी चर्चा आहे. याच्या एक्झॉस्ट आवाज थोडा स्पोर्टी असेल. ज्यामुळे या रोडस्टर बाईकमध्येही रायडरला स्पोर्टी बाईकचा अनुभव मिळेल. यात ग्राहकांना ट्रिपर नेव्हिगेशन देखील मिळणार आहे.


सुरक्षिततेसाठी ड्युअल चॅनल एबीएस


हंटर 350 च्या लुक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या रेट्रो नेकेड बाईकमध्ये गोलाकार हेडलॅम्प आणि मागील व्ह्यू मिररसह गोल आकाराची इंधन टाकी, लहान एक्झॉस्ट आणि गोल आकाराचे टेललॅम्प आणि टर्न इंडिकेटर मिळतील. या रॉयल एनफिल्ड बाईकला ड्युअल रियर शॉक ऍब्जॉर्बर्स आणि समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन मिळेल. समोर आणि मागील बाजूस डिस्क ब्रेकसह, ड्युअल चॅनल ABS सारखी सुरक्षा फीचर्स देखील मिळू शकतात. हंटर 350 सिंगल सीट तसेच वायर स्पोक आणि अलॉय व्हील या दोन्ही पर्यायांमध्ये सादर केली जाईल.


दरम्यान, रॉयल एनफील्ड हंटर 350 ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक असेल, असं बोललं जात आहे. मात्र याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कारण हे कंपनीचे नवीन उत्पादन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याची प्रारंभिक किंमत 1.70 लाख रुपये असू शकते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI