Honda Hawk 11: दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली नवीन Honda Hawk 11 (2022 Honda Hawk 11) बाईक जपानमध्ये लॉन्च केली आहे. ही बाईक निओ-रेट्रो कॅफे रेसर डिझाइन दर्शवते. जपानच्या बाजारपेठेत या बाईकची विक्री सुरू झाली आहे. निओ-रेट्रो रेसर बाईकची किंमत 1.397 मिलियन येन (भारतीय चलनात सुमारे 8.30 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ही बाईक या वर्षाच्या सुरुवातीला ओसाका मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती आणि आता ती बाजारात दाखल झाली आहे.
नवीन Honda Hawk 11 ला CRF1100L अॅडव्हेंचर टूरर आणि Rebel 1100 क्रूझर बाईक सारखेच पॉवरट्रेन मिळते. यात 1082 cc चे ट्विन-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 102 PS पॉवर आणि 6,250 rpm वर 104 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
नवीन Honda Hawk 11 च्या फीचर्स बद्दल सांगायचे झाले तर, यात अनेक राइडिंग मोड आहेत. यात स्पोर्ट, स्टँडर्ड, रेन आणि यूजर मोड ग्राहकांना मिळतील. या मोड्समध्ये, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HTSC) द्वारे पॉवर डिलिव्हरी, पॉवर लिमिट आणि इंजिन ब्रेकिंग आहेत. या बाईकला राईड-बाय-वायर थ्रॉटल कंट्रोल सिस्टम मिळते. यासोबतच या बाईकवर एलसीडी स्क्रीनही दिसत आहे.
या बाईकचे वजन 214 किलो आहे. तसेच नवीन होंडा हॉक 11 च्या सीटची उंची 820 मिमी आहे. बाईकमध्ये 14-लिटरची इंधन टाकी आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर समोरच्या चाकावर ट्विन हायड्रॉलिक डिस्क्स आहेत. तर मागील बाजूस एकच डिस्क वापरली गेली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- येत आहेत Yamaha चे 'हे' दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जबरदस्त लूकसह फीचर्सही आहेत दमदार
- Maruti Suzuki Car: आजपासून कार घेणं महाग; मारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ
- Top Safest Car: लहान-मोठ्यांसाठी असलेली 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कार; पाहा यादी
- 'या' दिवशी लॉन्च होणार Mercedes-Benz ची नवीन सी-क्लास लक्झरी कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Car loan Information:
Calculate Car Loan EMI