Aurangabad News: न्यायालयाचे स्वयंस्पष्ट आदेश असताना आणि वारंवार पाठपुरावा करून देतील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, जमिनीचा फेर घेत नसल्याने औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील मौजे देवपूर शिवरातील एका महिलेने विषारी औषध (Poisonous Medicine) पिऊन कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन (Self Immolation) करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. उषा वाल्मीक ताठे असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. 


उषा ताठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पतीकडील वडिलोपार्जित व कुटुंबाची एकत्रित मालकीची देवपूळ शिवारातील एकूण क्षेत्र 0 हे 50 आर क्षेत्र जमीन आपल्या नावावर करण्याबाबत त्यांनी महसूल विभागाकडे प्रकरण दाखल केले होते. दरम्यान पुढे प्रकरण न्यायालयात गेल्यावर, संदर्भीय अपीलनुसार न्यायालयाने देखील ताठे यांची मागणी मान्य केली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाआधारे आपल्या नावावर जमिनीचा फेर घेण्यासाठी उषा ताठे यांनी वेळोवेळी महसूल विभागाकडे पाठपुरावा केला. या काळात त्यांनी तलाठी कार्यालय,तहसीलदार आणि उपविभागीय कार्यालयात अनेकदा खेट्या मारल्या. मात्र तरीही त्यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. 


अनेकदा कार्यालयाच्या खेट्या मारल्या...


दरम्यान आपली मागणी मान्य होत नसल्याने ताठे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबतीत त्यांनी संबंधित विभागाला लेखी पत्राद्वारे कळवले देखील होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने काही दिवसांचा कालावधी मागितल्याने, त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला. परंतु त्यानंतर उषा ताठे यांनी कन्नड येथील तहसीलदार यांची भेट घेऊन, पुन्हा आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडली. तरीही त्यांच्या मागणीची कोणतेही दखल घेण्यात न आल्याने त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज त्यांनी विषारी औषध पिऊन कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला...


उषा ताठे यांनी कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज विषारी औषध पिऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी पिशोर येथील पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत ताठे यांच्या हातातील विषारी औषधाच्या बाटली वर झडप टाकून ओढून घेतली. तसेच विषारी औषधांची बाटली ताब्यात घेऊन, थाटे यांची समजूत काढली. तसेच पोलिसांनी ताठे यांचे आत्मदहन करण्यापासून मनपरिवर्तन केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News: उगाच नाही म्हणत 'कानून के हाथ लंबे होते हैं'; चार वर्षांपूर्वी हत्या करून पळालेल्या आरोपीला बेड्या