औरंगाबाद : संभाजी ब्रिगेडने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माढा, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर मतदारसंघात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणार आहे. इतर ठिकाणी युती आघाडीचे उमेदवार सोडून इतर सेक्युलर उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार नसतील, त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना वगळता इतर उमेदवारांना सहकार्य करणार आहे. चार प्रस्थापित पक्षांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे, मात्र सर्वसामान्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न त्यांनी कधीच सोडवले नाहीत, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला.
जे उमेदवार शेतकरी, बेरोजगार, युवक महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतीमालाला हमीभाव आणि दारुमुक्त गाव याबाबत भूमिका घेतील, त्यांना संभाजी ब्रिगेड बिनशर्त सहकार्य करेल, असं सांगण्यात आलं.
संभाजी ब्रिगेडचे लोकसभा 2019 चे उमेदवार
भिवंडी :- संजय काशिनाथ पाटील
जालना :- श्याम रुस्तुमराव शिरसाट
माढा :-विश्वंभर नारायण काशीद
रावेर :- रवींद्र दंगल पवार
उस्मानाबाद :- इंजि. नेताजी गोरे
पुणे :- विकास पासलकर/संतोष शिंदे
सोलापूर :- श्रीकांत मस्के
शिरुर :- शिवाजी उत्तम पवार