Aurangabad News: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा या वाघिणी (Tigress) अखेर आज रविवार (19 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. तर या बदल्यात सायाळ, इमू, कोल्हे आणि स्पूनबिल पक्षी असे एकूण 21 प्राणी औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात (Siddharth Garden And Zoo) यापूर्वीच आणले गेले आहेत. विशेष म्हणजे याला काही राजकीय मंडळींनी विरोध केला होता. 


औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील काही एकाकी प्राणी असल्याने, त्यांना जोडीदार मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. दरम्यान याच काळात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून हे प्राणी देण्यास मंजुरी दिली. पण त्याबदल्यात सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा या वाघिणी देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून औरंगाबादच्या (Aurangabad) सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात सोमवारी (13 फेब्रुवारी) रोजी 10 सायाळ, 2 इमू, 3 कोल्हे, आणि 6 स्पूनबिल पक्षी घेऊन पथक दाखल झाले होते. तर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा या वाघिणी अखेर आज रविवार (19 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले.


रंजना व प्रतिभा या दोन वाघिणींचे वय 2 वर्ष 2 महिने आहे. सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या (tiger) जोडीचे हे अपत्य आहेत. तर रंजना, प्रतिभा अहमदाबादला पाठविल्यानंतर 10 वाघ अजूनही सिद्धार्थ उद्यानात शिल्लक आहेत. त्यात सात पिवळे तर तीन पांढरे वाघ आहेत. तीन नर व सात मादी आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयाला 17 वाघ दिले आहेत. 1995 मध्ये ओरिसा येथील नंदन कानन प्राणिसंग्रहालयातून पांढऱ्या वाघांची ( नर आणि मादी) जोडी महापालिकेने आणली होती. त्यानंतर 2005 मध्ये पंजाबच्या चतबीर प्राणिसंग्रहालयातून दोन वाघ (tiger) आणि दोन वाघिणी (tiger) आणण्यात आल्या. त्यातून 27 वाघांचा विस्तार महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात झाला.


Aurangabad News: यांची होती उपस्थिती!


औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा या वाघिणी अखेर आज अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. यावेळी सहायक अधिक्षक डॉ. डि. पी. सोळंकी, प्रभारी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. शाहेद शेख, राकेशभाई पटेल, रंजितसिंग, सियारामभाई, समीर, मनोजभाई, दिनेशभाई लोहार या वेळी उपस्थित होते.


इतर बातमी: 


Shiv Jayanti 2023: 3100 चौरस फुटांची रांगोळी, 151 फूट उंच शिवस्तंभ, 21 हजार सुर्यनमस्कार; राज्यात शिवजयंतीचा जल्लोष