Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आज देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येक शिवप्रेमी शिवरायांना अभिवादन करून नतमस्तक होत आहे. दरम्यान औरंगाबादहून (Aurangabad) आग्र्यासाठी निघालेल्या शिवप्रेमींनी धावत्या रेल्वेत रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी शिवरायांचा पाळणा गायला. तर संपूर्ण रेल्वेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावर्षी आग्र्याच्या किल्ल्यात ऐतिहासिक अशी शिवजयंती साजरी केली जात आहे. यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी कालपासून आग्र्यात दाखल होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यासाठी औरंगाबादहून एक विशेष रेल्वे शनिवारी आग्र्याच्या दिशेने निघाली. यात हजारो शिवप्रेमी यंदाची शिवजयंती साजरी करण्यासाठी मोठ्या उत्साहात आग्र्याकडे निघाले आहे. दरम्यान रात्री बारा वाजता याच रेल्वेत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाळ शिवाजींना पाळण्यात घालून, उपस्थित महिलांनी शिवरायांचा पाळणा गायला. यावेळी शिवप्रेमीमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना!
आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये यावर्षी ऐतिहासिक शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना झाले आहेत. कुणी रेल्वेने तर, कोणी विमानाने आग्राकडे निघाले आहे. तर अनेकजण कालपासूनच आग्र्यात दाखल झाले आहे. तसेच शेकडो शिवप्रेमींना घेऊन चाललेली रेल्वे काही वेळेत आग्र्यात पोहोचणार आहे. त्यामुळे आजचा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमी आतुरतेने वाट पाहतोय.
दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती!
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा किल्ल्यातील दीवान-ए-आममध्ये पहिल्यांदाच साजरी होते आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपला त्याच दीवान-ए-आम मध्ये 19 फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे असणार आहेत. छत्रपती शिवराय यांचे जीवनदर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर केला जाणार असल्याची माहिती, विनोद पाटील यांनी दिली आहे.
प्रशासनाकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी!
आग्रा किल्ल्यातील दीवान-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यास सुरुवातीला पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या कार्यक्रमाला परवानगी मिळाली आहे. मात्र किल्ल्यातील दीवान-ए-आममध्ये मोजक्याच लोकांना परवानगी असणार आहे. तर कार्यक्रम स्थळाची आग्र्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी पाहणी केली. तसेच आयोजकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिले आहे. तर उर्वरित शिवप्रेमींसाठी किल्ल्यासमोर एलईडी वॉल लावून विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने देखील या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: