Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) नारेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाडेकरूने घरमालकिणीसोबत सूत जुळवत लग्नाचे आमिष देऊन अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने भाडेकरू तरुणाविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मोसीन मो. मोमीन शेख (वय 32 वर्षे, रा. नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नारेगाव गोल्डन हॉल समिहा मस्जिद परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय महिलेकडे मोहम्मद मोसीन हा भाडेकरू म्हणून राहायला आला होता. तो वॉशिंग सेंटरवर काम करत होता. दरम्यान घरमालक महिला आणि मोहम्मद मोसीनची चांगलीच ओळख झाली. पुढे मोहम्मद मोसीनने घरमालक असलेल्या महिलेसोबत सूत जुळवले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून, अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पुढे महिलेने लग्नाची मागणी करताच आरोपी मोसीनने नकार देत खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर महिलेने पोलिसात धाव घेतली. तर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.


Aurangabad Crime News: वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार!


मोसिनेन घरमालकीन महिलेला आपल्या प्रेमात ओढले. लग्नाचे आमिष दाखवत, तसेच माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत, तर फोटो व्हायरलबरोबरच मी आत्महत्या करीन अशी धमकी देत तिच्यासोबत एप्रिल 2022 ते 17 फेब्रुवारी- 2023 च्या दरम्यान नारेगाव, तसेच नाशिक, जालना (jalna), मिसारवाडी, किराडपुरा आणि वैजापूर (vaijapur) आदी ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान वैजापूर येथे असताना पीडितेने औरंगाबादला (Aurangabad Crime News) परत जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी तिला मोहम्मद मोसीनने बेदम मारहाण केली असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 


Aurangabad Crime News: अखेर पीडित महिलेची पोलिसात धाव!


लग्नाची आमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याने आणि वारंवार होणाऱ्या त्रासाला महिला कंटाळली होती. अनेकदा विनंती करून देखील आरोपी मोसीन दाद देत नव्हता. त्यामुळे अखेर  पीडितेने 17 फेब्रुवारी रोजी थेट जिन्सी पोलिस ठाणे गाठून मोहम्मद मोसीनबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून मोसीन विरुद्ध बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे हा गुन्हा एमआयडीसी सिडको पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज करीत आहेत.