औरंगाबाद : रोहयो मंत्री संदिपान भुमरे (sandeepan bhumre) यांचे बंधू राजू भुमरे यांनी रस्त्याच्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह (facebook live) करणाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पाचोड मधील बबलू उर्फ रंजीत नरवडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते भाजपचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप नरवडे यांनी केला आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  


याबाबत अधिक माहिती अशी, रणजीत नरवडे हे बीड हायवे क्रमांक 211 ते साजेगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह करत होते. त्याच वेळी राजू भुमरे यांच्यासह काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन तेथे आले आणि शिवीगाळ करत रणजीत यांना बेदम मारहाण केली आहे. रणजीत यांच्या पाठीवर मारहाणीचे वळ उमटलेले  आहेत. त्यांच्या हातावर देखील मारहाण केल्याच्या खुना आहेत. हायवे क्रमांक 211  साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवडे यांचा यांचा आरोप आहे. 


कोण आहेत संदिपान भुमरे? 
संदिपान भुमरे हे औरंगाबाद मधिल शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.


शिवसेना- भाजप वाद चिघळणार का? 
भाजप-शिवसेना यांची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर अत्यंत तिखट शब्दात टीका करत आहेत. त्यातच भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. हे प्रकरण ताजे असतानात आज ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या भावाने भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात वाद होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chopper Crash ooty : ऊटीमधील दुर्घटनाग्रस्त हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील चार जणांचा मृत्यू


CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?