औरंगाबाद : सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही. आज सुप्रीम कोर्टमध्ये माझ्या वतीने व समाजाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ पी.एस. नरसिंहा व अॅड. संदीप देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला विनंती केली पाचपेक्षा अधिक न्यायमूर्तीकडे वर्ग करावा. आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे. यावर न्यायालयाने सांगितले ज्यावेळेस सुनावणीसाठी हे प्रकरण निघेल त्यावेळेस आम्ही चीफ जस्टिसला कळवू असं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले आहेत.


बुधवारी पुन्हा एकदा पीजीच्या अॅडमिशन संदर्भात सुनावणी ठेवण्यात येणार आहेत आणि बुधवारच्या दिवशी अॅडमिशन संदर्भात काय न्यायालय निर्णय देईल याठिकाणी सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावेळेस सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. बुधवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांचे राऊंड थांबू नये. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हक्काचे ॲडमिशन मिळावे. जे काय आरक्षण आहे ते तसेच शाबूत राहावे, असे राज्य सरकारने प्रयत्न करावेत.


मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद


आम्ही आज समाधानी आहोत आणि आज न्यायालयाने फार मोठा दिलासा मराठा समाजाला दिलेला आहे. अंतिम सुनावणीच्या पूर्वी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे प्रकरण पाठवायचं की नाही पाठवायचं याचा निर्णय आम्ही त्यामुळे पाच खंडपीठाची मागणी न्यायालयाने गांभीर्याने ऐकली हे मराठा समाजासाठी फार समाधानकारक आहे.


पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामधील आरक्षणाविरोधातील निर्णय बुधवारी होईल. राज्य सरकारने यासाठी तयारी करण्याची गरज आहे. आज आपल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही ही आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की ही लढाई आपणच जिंकू, असंही विनोद पाटील म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या