Aurangabad News: गृहमंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने आंतरिक सुरक्षा पदक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. ज्यात राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना दुसऱ्यांदा शौर्य पदक जाहीर (Gallantry Medal) करण्यात आले आहे. गडचिरोलीतील पाच जहाल नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर मध्ये खात्मा करून एक नक्षल जिवंत पकडल्याबाबत राष्ट्रपतींकडून हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2021 रोजी मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनटाद जंगलात नक्षल विरोधी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते. दरम्यान त्या परिसरात दबा धरून बसलेल्या 80 ते 90 नक्षलांनी सकाळी पाच वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन सी-60 कमांडो पथकाच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला. त्यामुळे मनिष कलवानिया यांच्यासह सी-60 कमांडो पथकाने प्रत्युतरात नक्षलींच्या दिशेने जोरदार कारवाई फायरिंग सुरू केली. यावेळी पोलीसांचा वाढता दबाब पाहुन दुपारी एक वाजेच्या सुमारास नक्षल तेथून पळुन गेले. यावेळी सी-60 कमांडो आणि नक्षल यांची 8 ते 9 तास भीषण चकमक चालली होती.
जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा...
दरम्यान नक्षल पळून गेल्याने सी-60 कमांडो पथकाने घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवले असता, तेथे पथकाला एक नक्षल यास जिवंत पकडण्यात, तर पाच जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. यामध्ये नक्षली कारवाईत अग्रेसर असणारा त्यांचा कुख्यात नक्षली कंमाडर यास सुध्दा टिपण्यात पथकांला यश आले होते. या पूर्ण कारवाईत नक्षलींचा मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळून आले होते. दरम्यान, नक्षलीना प्रत्युत्तर देताना मनिष कलवानिया यांच्यासह त्यांचे तीन सी-60 कमांडो जवान जखमी झाले होते.
प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला
नक्षलींसोबत तब्बल 9 तासांच्या चकमकीत कलवानिया जखमी झाले होते. दरम्यान स्वत: जखमी असून देखील त्यांनी आपल्या जखमी जवानांना आत्मविश्वास देत त्यांचे मनोबल यशस्वीरित्या उंचावत ठेवले होते. हे संपुर्ण ऑपरेशन अत्यंत घनदाट जंगलात जवळपास 80 किमी आतमध्ये सुरू होते. संपुर्ण ऑपरेशन तीन दिवस चालले होते. तर मनिष कलवानिया यांच्यासह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला. या साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणाऱ्या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत मनिष कलवानिया यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन दुसऱ्यांदा “शौर्य पदक” जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.
यांनाही मिळाले पुरस्कार!
दरम्यान याचवेळी गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित व दुर्गम क्षेत्रात दोन वर्ष अतिउत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जयदत्त बबन भवर यांना देखील गृहमंत्रालय भारत सरकार यांचेकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News : हिम्मत पाहा, पोलीस कॉन्स्टेबलने चक्क 50 हजारांची लाच मागितली; एसीबीने केली कारवाई