औरंगाबाद : कोरोना संकटातही आपला जीव धोक्यात घालून पोलीस बांधव कर्तव्य बजावत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना औरंगाबदमध्ये घडली. रस्त्यावर गर्दी का करता असे समजावून सांगणाऱ्या पोलीस हवालदाराला शिवीगाळ करीत अंगावर दगड मारत धारदार सुरा भिरकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मयुरपार्क भागात शनिवारी रात्री हा हल्ला झाला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


हवालदार अनिल प्रल्हादराव पिवळ औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून नियंत्रण कक्षात ते नेमणुकीस आहे. रात्री ड्युटी संपवून घरी जात असताना कृष्णा मंगल कार्यालय जवळ तरुणच्या घोळक्याने विना मास्क गर्दी केल्याचे दिसल्याने पिवळ यांनी तरुणांना समजावून सांगत असताना त्या गर्दी मधून अमोल समोर आला. त्याने गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून पिवळ यांच्या अंगावर दगड भिरकावून पसार झाला. पोलिसांचे पथक माघारी जाताच पिवळ हे घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता अचानक अंधारातून अमोलने दीड फुटी धारदार सुरा पिवळ यांच्या अंगावर भिरकावला. प्रसंगावधान राखल्याने पिवळ थोडक्यात बचावले.


सात हत्याने मराठवाडा हादरला! बीडमध्ये तीन तर लातूर व नांदेड मध्ये दोघांचा खून


या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात कोरोना लॉकडाऊनच्या दरम्यान पोलिसावर हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. कोणाच्या संकटातही पोलीस आपला कर्तव्य बजावत असतात. मात्र, काही समाजकंटक या काळात पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले करत आहेत. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.


पोलिसांवर हल्ले वाढले
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी याचा सर्व ताण पोलीस यंत्रणेवर आला आहे. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहे. आजची घटना औरंगाबादमधील तिसरी घटना आहे. एकीकडे पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात त्यांच्यावर असे हल्ले होत असतील तर पोलिसांचे मनोबल कमी होण्याची शक्यता पोलीस कर्मचारी बोलून दाखवत आहे.


Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट