बीड : आज दिवसभरात मराठवाड्यात झालेल्या सात हत्याने मराठवाडा हादरून गेला आहे. बीडमध्ये दोन भाऊ आणि आई असे एकूण तिघांचे हत्याकांड घडले. नांदेडमध्ये मठाधिपतीसह एकाची हत्या झाली आहे. तर तिकडे लातूरमध्ये दोघांचा खून झालाय. आधीच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा घटनांमुळे नागरिकांचे मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे.
तिहेरी हत्याकांडाने बीडमध्ये खळबळ
आईसह तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने बीडमध्ये एकच खळबळ माजलीय. ही घटना बीड शहरातील शुक्रवार पेठ भागात आज भर दुपारी घडली. संगीता कोकणे यांच्यासह दोन मुले संदेश आणि मयूर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आई आणि एका मुलाला बॅटने ठेचून मारण्यात आले. तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आलंय. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून संशयित म्हणून महिलेचा पती संतोष कोकणे याला ताब्यात घेण्यात आले आहे. संगीता कोकणे, संदेश कोकणे या दोन्ही माय लेकांचे मृतदेह एका खोलीत आढळून आले.
लातुरात होम क्वॉरंटाईनच्या नादातून दोघांची हत्या
होम क्वॉरंटाईन होण्याच्या वादातून लातूर जिल्ह्यात दोघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुंबईत राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकास होम क्वॉरंटाईन व्हावे, असे सांगितल्याने वाद झाला. या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
नांदेड जिल्ह्यातील नागठाणा येथे महाराजांसह दोघांची हत्या; दुहेरी हत्याकांडात गावकऱ्यांचा मोठा खुलासा
या घटनेत फिर्यादी शत्रुघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले. सदर घटनेत विद्यमान बरमदे यासह सहा जण आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कासारशिरसी पोलिसांनी सांगितले आहे.
नागठाणा येथील मठाधिपतीसह सेवकाची हत्या
नांदेडच्या उमरी तालुक्यातील नागठाणा येथील पशुपती नाथ महाराजांची रात्री दीडच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी साईनाथ लिंगाडे याने काल रात्री 12 वाजताच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात हत्या केली. त्यानंतर आरोपी मठात गेला त्याने महाराजांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नगदी रक्कम लॅपटॉप चोरी केला आणि महाराजांचा मृतदेह त्यांच्यात कारमध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मठाच्या बाहेर गाडी काढताना ती गेटला धडकली. गाडीचा आवाज आल्याने लोक गोळा झाले. तेव्हा लोकांना महाराजांचा मृतदेह आणि ऐवज गाडीत सापडले. संधी साधून आरोपी पळून गेला. आता आरोपीला तेलंगणातील तानुर या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.
Nanded Sadhu Murder | नांदेडमधील मठाधिपतींच्या हत्येप्रकरणी आरोपीला तेलंगणात पोलिसांकडून अटक