Aurangabad University Exam: डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवी परीक्षेबाबत सुरु असलेला गोंधळ थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाचा आता विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात आज विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन सुद्धा केले. तसेच परीक्षा एक महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी सुद्धा केली.


काय म्हणाले विद्यार्थी...


यावेळी बोलताना आंदोलन करणारे विद्यार्थी म्हणाले की, जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचा दबाव आला आहे. 4 एप्रिलपासून प्रत्यक्षात वर्ग सुरु होईल आणि 20 मी रोजी संपतील असे लेखी सांगण्यात आले होते. पण या 45 दिवसात फक्त 35 दिवस वर्ग भरवण्यात आले. एवढ्या कमी वेळेत विद्यार्थ्यांनी संपर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा असा प्रश्न पडला आहे. इच्छा नसतानाही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाठी आणखी वेळ देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


विद्यार्थी मानसिक तणावात...


गेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला होता. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली. त्यांनतर पेपर पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान या काळात चार-पाच दिवसात दोन ते तीन वेळा केंद्र बदलण्यात आले. बदल झालेले केंद्र आणि देण्यात आलेल्या हॉल तिकीटमध्ये फरक आहे. त्यामुळे या सर्वात विद्यार्थी मानसिक तणावात असून, त्यांना परीक्षेसाठी आणखी वेळ देण्याची मागणी सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.


अभ्यास कधी करायचा...


यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल आहे की, विद्यापीठाने दिलेल्या सूचनानुसार 21 -22 अकॅडमिक कैलेंडर ठरवलं गेलं होतं. मात्र या पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू झालेच नसून, पेपर सुद्धा झाले नाही. 45 दिवसाचे अभ्यासक्रम 35 दिवसात संपले. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या युनिट टेस्ट द्यायच्या होत्या, सबमिशन्स करायचे होते, प्रोजेक्ट तयार करायचे होते, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन चा अभ्यास करायचा होता, असाइनमेंट लिहायच्या होत्या, विद्यापीठ संलग्न रिपोर्ट देखील तयार करायचे होते.मग एवढ्या कमी वेळेत हे सर्व करून अभ्यास कधी करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI