Aurangabad Rain Update: पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. असे असताना जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे. पाहू यात कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती आहे.
पैठण: तालुक्यात सुरवातीलाच शेतकऱ्यांकडून 58 हजार 331 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ज्यात सोयाबीन 1 हजार 278, कापूस 58 हजार 606, तूर 10 हजार 54, मुग 1 हजार 298, उडीद 67.08, बाजरी 6 हजार 509 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र आता जोरदार पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
वैजापूर: तालुक्यात 60 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यानुसार 55 हजार 366 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ज्यात कपाशीचे 30 हजार 693 हेक्टर, मका 16 हजार 938 हेक्टर, बाजरी 1 हजार 372 हेक्टर, सोयाबीन1 हजार 631 हेक्टर, भुईमुग 787 हेक्टर, मुग 1488 हेक्टर, उडीद 55 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
गंगापूर: तालुक्यात सुरवातीला अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या पेरण्यांमध्ये बाजरी 20 हेक्टर, मका 556 हेक्टर, तूर 27 हेक्टर, मुग 27, ऊस गाळप 338, सोयाबीन 59, कापूस 9121, इतर फळबाग 37 हेक्टर, अद्रक 139 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे.
खुलताबाद: तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लावली आहे. तर आतापर्यंत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात 34 हजार 977 हेक्टर पेरण्यायोग्य आहे. त्यापैकी 27 हजार 981 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा कापूस,सोयाबीन,मका आणि अद्रक लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिला आहे.
कन्नड: तालुक्यात70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 72 हजार हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात कापूस 36 हजार हेक्टर, मका 26 हजार हेक्टर, अद्रक 2 हजार 200 हेक्टर, ऊस 6 हजार 500 हेक्टर, सोयाबीन 2 हजार 800 हेक्टर, उडीद-मुग आणि तूर 700 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कन्नड तालुक्यात पुढील काही दिवसात चांगल्या पावसाने हजेरी न लावल्यास पिके करपतील.
फुलंब्री: तालुक्यात 88 टक्के पेरण्या झाल्या असून, त्यानुसार 48 हजार 500 हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. ज्यात कपाशी 20 हजार 60 हेक्टर, मका 13 हजार 280 हेक्टर, बाजरी 3 हजार 400 हेक्टर, तूर 3 हजार 444 हेक्टर, मूग 595 हेक्टर, उडीद 510 हेक्टर, भुईमूग 480 हेक्टर, सोयाबीन 410 हेक्टर, भाजीपाला 382 हेक्टर, ऊस 652 हेक्टर, अद्रक1 हजार 760 हेक्टर, चारा पिके 595 हेक्टर, इतर पिके 2 हजार 932 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
सिल्लोड: तालुक्यात 98 हजार 750 हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य असून, त्यापैकी 85 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ज्यात कापूस 31 हजार 773 हेक्टर, मका 27 हजार 910 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर उरलेल्या क्षेत्रावर उडीद, मुग, अद्रक आणि मिरचीची लागवड करण्यात आली आहे.