Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील बिडकीन गावात धक्कादायक घटना समोर आली असून, दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मुरूम उपसावरून हा वाद झाला असल्याचे कळत आहे. ज्यात किशोर अंकुश धर्मे याच्यावर हल्ला करण्यात आला असून, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे कळत आहे.  


पोलिसांकडून मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, बिडकीन डीएमआयसी परिसरात शासनाने अधिग्रहण केलेल्या जागेवरील मुरूम उपास करण्यात येत आहे. कोणतेही टेंडर न काढता अनधिकृतपणे हा उपसा सुरु आहे. दरम्यान यावरूनच आज सकाळी दोन गटात वाद झाला. ज्यात वाद एवढा विकोपाला गेला की, दोन गटात हाणामारी झाली. ज्यात किशोर धर्मे नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला असून, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला सुरवातीला बिडकीन येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून, आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घाटी रुग्णालयात धाव घेत, घटनेची माहिती घेतली आहे. तर याप्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळत आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर नेमका वाद कशावरून झाला याची माहिती देखील पोलिसांकडून घेण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: