Aaditya Thackeray On Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्या विधिमंडळात अनावरण होणार आहे. मात्र त्यापूर्वीचं या सोहळ्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान यावरचं प्रतिक्रिया देताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे."बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तर 'माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण होत आहे”, असा खोचक टोला आदित्य यांनी लगावला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उदघाटन झालं यावेळी ते बोलत होते. 


यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेलं आहे. राज्य ओके नाही पण हे ओके होऊन बसले आहेत. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील तेवढं आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचं अनावरण विधिमंडळात केलं जाणार आहे. मात्र या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण झालं असं माझं आजोबा म्हणतील अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. शिवाय घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार असल्याचं म्हणत त्यांनी आक्षेपही घेतला.


लवकरच भांडाफोड करणार! 


पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात. तुम्ही असं काय खाल्लं होतं जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावं लागलं. तर ही टोळी उद्योगात घुसल्यानंतर आपलं काही खरं नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. तर राज्यात बोगस कंपन्या आणल्या असून, याबाबत पत्रकार परिषद घेऊन यांचा भांडाफोड करणार असल्याच देखील ते म्हणाले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगत काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.


आदित्य ठाकरेंची बॅटिंग 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त औरंगाबादच्या रांजणगाव येथे 'हिंदुहृदयसम्राट चषक' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. तर याच क्रिकेट स्पर्धेसाठी उदघाटक म्हणून आदित्य ठाकरे उपस्थित होतो. यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील जोरदार बॅटिंग करत क्रिकेटचा आनंद लुटला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते यांची देखील उपस्थिती दिसून आली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका