Aurangabad Rain News: आधीच अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद (Aurangabad) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. ज्यामुळे रब्बीच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. ज्यात गव्हाच्या पीकांना सर्वाधिक फटका बसला असून, औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडली आहेत.
मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार वाऱ्यासह विजेचा कडकडाट देखील पाहायला मिळाला. तर तोंडघशी आलेला गव्हाचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे झाले आहे. प्लॉटचे प्लॉट आडवे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. आधीच खरीप हातून गेला असतानाच आता रब्बी देखील हातून जाण्याचे मार्गावर आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गव्हाचे पीक आडवे...
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शेदूरवादा आणि सावखेडा परिसरात गव्हाचे पिकाच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर पैठण तालुक्यातील नांदलागाव शिवारातील शेतकरी रशीद शहा यांच्या गट नंबर 61 मधील शेतातील गव्हाच्या पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. रात्री झालेल्या पावसाने आणि जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील गव्हाचे पीक आडवे झाले आहे. खरीपात अतिवृष्टीने मोठं नुकसान झाले असताना, आता गव्हाचे देखील नुकसान झाले असल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर महसूल विभागने याबाबत पंचनामे करण्याची देखील मागणी केली जात आहे.
आज देखील पावसाचा अंदाज...
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नसून, 25 जानेवारी रोजी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान देखील तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातमी:
Aurangabad: मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची चिंता वाढली