Aurangabad Fire News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) शहानुरमिया दर्गा परिसरातील एका दुकानाला आग (Fire) लागल्याची घटना रात्री साडेआठ वाजता समोर आली होती. त्यानंतर पाहता-पाहता आजूबाजूच्या विविध प्रकारच्या छोटछोट्या चार ते पाच दुकानांमध्ये ही आग पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र आग इतकी भीषण होती की, आग विझवण्यासाठी तब्बल अग्निशमन दलाचे सहा बंब आणि खाजगी दोन पाण्याचे टँकरला बोलवण्यात आले होते. 


औरंगाबाद शहरातील शहानुरमिया दर्गा परिसरातील डी मार्ट जवळ असलेल्या एका दुकानात रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. दरम्यान पाहता-पाहता आगीचे प्रमाण वाढले. त्यामुळे बाजूच्या दुकानात असलेल्या लोकांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. पुढे पहिल्या दुकानातील आग वाढली आणि आजूबाजूला असलेल्या दुकानात आग पसरली. त्यामुळे याची माहिती जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबतच अग्निशमन दलाला देखील याची माहिती देण्यात आली. मात्र आगीचे प्रमाण वाढत गेल्याने पदमपुरा अग्निशमन केंद्रातील 4 बंब, सिडको अग्निशमन केंद्रातील 1 बंब, चिखलठाणा अग्निशमन केंद्रातील एक बंब असे एकूण सहा अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मोठ्या परिश्रमाने अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 


दुकानदार गेले पळून


उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानुरमिया दर्गा चौकातील डी मार्ट जवळ दुकानांना आग लागली. याठिकाणी अफसर खान जफर खान बागवान यांचे पाच दुकान होते. ज्यात वेगवेगळ्या व्यावसायिकांचे दुकाने होते. जेव्हा आग लागली तेव्हा दुकाने उघडी होती. मात्र पहिल्या दुकानात लागलेली आग वाढताच आजूबाजूला असलेल्या दुकानातील लोकांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला. मात्र जेव्हा आग वाढली तेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी हातोड्याने या दुकानाचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. पण, यश मिळत नसल्याने अखेर जेसीबीने शटर तोडत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.


अशी आगीची परिस्थिती...



  • रात्री 08.30 वाजेदरम्यान दुकानांना आग लागली

  • रात्री 08.43 दरम्यान अग्निशामकचे बंब घटनास्थळी आले.

  • अथक परिश्रमाने 09.35 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली

  • आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहा अग्निशमन बंब दाखल झाले होते.

  • सोबतच दोन खाजगीपाण्याचे दोन टँकर आणि एक जेसीबीची मदत घेण्यात आली. 

  • यावेळी अग्निशमन दल, पोलिसांसह दोन हजारांवर नागरिकांच्या जमाव यावेळी जमला होता. 


'या' दुकानात लागली आग...



  • किराणा दुकानांमध्ये आईस्क्रीम कोल्ड्रिंक आणि डबल डोअर फ्रिज होते, त्याला आग लागली. या दुकानातील सामानाचे 5 लाखांचे नुकसान. 

  • शेख नईम यांचे कुशनचे दुकान होते, या दुकानातील 1 लाखाचे नुकसान झाले. 

  • हेअर सलूनचे दुकान देखील जळून खाक झाले असून यात दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

  •  सोबतच बाजूला असलेल्या पंक्चरची दुकान देखील जळून खाक झाली आहे. 


यांनी विझवली आग! 


अग्निशमन केंद्र अधिकारी डी. डी. साळुंखे, विजय राठोड,  विनायक कदम,  ड्युटी अधिकारी अनिल नागरे, रमेश सोनवणे, विनायक लिमकर, अग्निशामक जवान पद्माकर बकले, आकाश नेहरकर, शुभम आहेरकर, भगवान शिंदे, अक्षय नागरे, किरण पागोरे, इरफान पठाण, मयुर कुमावत, संग्राम मोरे, शिवसभा कल्याणकर, समीर शेख, वाहन चालक असिफ शेख, मनोज राठोड, शेख रशीद, आकाश हुसे, शँकर दुधे यांनी आग विझवली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad: मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची चिंता वाढली