Ajanta-Ellora Caves: भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये जी-20 देशांची परिषद होणार आहे. दरम्यान या काळात परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे प्रतिनिधी मंडळ औरंगाबाद शहरालाही भेट देणार आहे. यावेळी जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना दाखवली जाणार आहे. मात्र 'या पाहुण्यांना काय दाखवू' असा प्रश्न पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनीच विचारलाय. कारण वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला यांना फेरीवाल्यांनी वेडा घातला असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची खंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी व्यक्त केली आहे. 


याबाबत 'एबीपी माझा'ला बोलतांना चावले म्हणाले की, वारंवार जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. पोलीस अधीक्षक म्हणतात की, तिथे जोपर्यंत गुन्हा होत नाही, तोपर्यंत मी काही करू शकत नाही. यामुळेच जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जाच आता धोक्यात आल्याचं खुद्द पुरातत्व अधिकाऱ्यांनीच म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक वारसास्थळांच्या यादीतून वेरूळ-अजिंठा लेणीला वगळले जावू याची काळजी घ्यावी असही पुरातत्व विभागाच्या आधिकारी चावले म्हणाले आहे.  



  • वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. 

  • परिस्थिती अशीच राहिल्यास वेरूळ-अजिंठा लेणीचा वारसास्थळाचा दर्जा जाण्याची शक्यता आहे. 

  • भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. 

  • स्थनिक प्रशासनाचा दुर्लक्षितपणा याला कारणीभूत असल्याचं देखील रातत्व विभागाच्या आधिकारी म्हणाले आहे. 


वारसास्थळांच्या यादीतून लेण्या वगळण्याचा धोका...


वेरूळ आणि अजिंठाची लेणी हे औरंगाबादचं जागतिक वैभव आहे. तर देशासह जगभरातील पर्यटकांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या वेरूळ-अजिंठा लेण्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे या दोन्ही लेण्या पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशातील पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र आता याच अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या जागतिक वारसास्थळांच्या यादीतून वगळल्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली आहे.


वारसास्थळांच्या मिळालेला दर्जा कायमस्वरूपी नसतो...


अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोऱ्या, थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढत असल्याने अजिंठा आणि वेरूळ लेण्याचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं चावले यांनी म्हंटले आहे. तर जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो, विशेष म्हणजे यापूर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून तीन वारसास्थळे काढण्यात आली असून, मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यामुळे वेळीच तत्काळ योग्य पाऊले न उचल्यास अजिंठा आणि वेरूळ लेणीचे देखील जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा  जाण्याची भीती आहे.


यामुळे दोन्ही लेण्याचा जागतिक दर्जा धोक्यात



  • लेणी परिसरात अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोरीच्या घटना वाढल्या आहे.

  • थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

  • पुरातत्व कायद्यानुसार कारवाई करूण्यास प्रशासन असमर्थ ठरतो.

  • याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केलाय जात नाही.

  • पोलिसांकडून देखील विशेष कारवाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळतेय.