Tanaji Sawant on Maratha Reservation: नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत राहणारे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे (Controversial Statement) संताप व्यक्त केला जात आहे. सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ सावंत यांना समज द्यावी अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. 


तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देतांना विनोद पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांनी एक आगळवेगळ वक्तव्य केले असून, त्याचा मी निषेध करतो. मागच्या काळात जेव्हा त्यांना मंत्री व्हायचं होतं, त्यावेळी हेच मराठा कार्यकर्ते त्यांच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जात होते. याचा त्यांना विसर पडला आहे का?,.. त्यामुळे कुणाच्या ताकदीवर कोणत्या गैरसमजुतीतून सावंत यांनी हे विधान केले आहे. सावंत यांचे विधान अतिशय खालच्या दर्जेचं असल्याचं विनोद पाटील म्हणाले. 


अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील 


पुढे बोलतांना विनोद पाटील म्हणाले की, मराठा समाजातील 50 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान देऊन हा मराठा क्रांती मोर्चा उभा केला आहे. त्यामुळे सरकार कुणाचा आहे आणि कुणाचा नाही याच्याशी आमचा काहीही संबध नाही. राज्यात कोणतेही सरकार असल्यास आमची मागणी मराठा आरक्षणाचीच असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सावंत यांना समज द्यावी अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. 


मराठा समाज बदनाम होतोय...


यावर पुढे बोलतांना पाटील म्हणाले की, मराठा तरुणांना टिकणारे आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे ओबीसीतून टिकणारे आरक्षण मिळत असेल तर तरुण ओबीसीमधून आरक्षण मागतील. तानाजी सावंत हे राज्याचे कॅबिनेट मंत्री असून,जबाबदार व्यक्ती आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे मराठा समाज बदनाम होत असल्याच विनोद पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


Maratha Reservation: तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; नाना पटोले यांची मागणी


Tanaji Sawant : मराठा समाजाची मी माफी मागतो; तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त