Aurangabad Crime News: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना समोर आली असून, गावातील एकाने दोघांच्या मदतीने विवाहित महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ (Video) तयार करून तो गावात व्हायरल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, महिला शेती काम करत असून तिचा पती ड्रायव्हर आहे. दरम्यान 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता महिला आपल्या गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी त्यांच्याच गावातील भगवान अशोक सुकासे हा महिलेच्या पाठीमागे शेतात आला. पिडीत महिलेला एकटीच असल्याचं पाहून महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तर मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू दे असा म्हणून लागला. मात्र महिलेन त्याला नकार देऊन, आपली सुटका करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी भगवान सुकासे याने महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील केला. 


व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी... 


भगवान सुकासे यांनी पीडित महिलेवर बलात्कार करताना त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगीतले तर हा व्हीडीओ मी दुसऱ्यांना दाखवुन देईल व सर्व गावात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. सोबतच तुझ्या पतीला हा व्हिडिओ दाखवल्यास तोही तुला मारहाण करेल अशी धमकी देत तेथून निघून गेला. यामुळे महिला घाबरली आणि याबाबत तिने कुठेही वाच्यता केली आहे. 


पुन्हा बलात्कार केला...


दरम्यान 1 डिसेंबर रोजी पीडित महिला स्वच्छालयास जाण्यासाठी निघाली असता रस्त्यात तिला पुन्हा  भगवान सुकासेने अडवले. यावेळी तिच्यासोबत रामेश्वर अशोक सुकासे आणि अमरनाथ सुनिल सुकासे हे देखील दुचाकीवर आले. या तिघांनी पिडीत महिलेला ओढत एका कपाशीचे शेतात नेले. त्यानंतर पुन्हा भगवान सुकासे याने महिलेवर बलात्कार केला. तसेच भगवान सुकासे याने याबाबत कुणाला सांगितले तर तुझ्या पतीला मारून टाकील अशी महिलेला धमकी दिली. 


व्हिडिओ गावात व्हायरल केला... 


महिलेवर अत्याचार करतांना भगवान सुकासेने पिडीत महिलेचा व्हिडिओ तयार केला होता. दरम्यान हा व्हिडिओ गावात व्हायरल देखील केला. त्यामुळे महिलेच्या पतीपर्यंत हा व्हिडिओ पोहचल्याने त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या भावाला बोलावून माहेरी घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेचा भाऊ आल्यावर पीडित महिलेने आपल्या भावाला सोबत घेऊन गंगापूर पोलीस ठाणे गाठले. तसेच वरील तीनही आरोपींच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला.