Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एका धक्कादायक घटना उघडकीस आली असून, सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या (Suicide) केली आहे. औरंगाबाद शहराच्या बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय या तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आपला जीव दिला आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या आईला भावनिक पत्र लिहत, 'आई मला माफ कर, आता जगण्यात अर्थ वाटत नाही' असे म्हंटले आहे.  सचिन भवर (वय 24 वर्षे रा.बालाजी नगर, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बालाजीनगर परिसरात राहणारा सचिन भवर सीए परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने याची परीक्षा देखील दिल होती. मात्र निकाल येण्याचे बाकी होते. पण असे असतानाच सचिनने अभ्यासक्रम अवघड असल्याने त्याला झेपत नव्हता. त्यामुळे तो तणावात असल्याने सोमवारी रात्री घराबाहेर पडला होता.


घरातून बाहेर पडलेला सचिन सरळ औरंगाबाद-नगर रस्त्यावर असलेल्या छावणीतील रेल्वे उड्डाण पुलाखाली असलेल्या रेल्वे पटरीजवळ गेला. त्यानंतर त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना काही जणांनी छावणी पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सचिनचा मृतदेह टु मोबाईल व्हॅने घाटीत आणला गेला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


आईला लिहलं भावनिक पत्र...


दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी सचिनने आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहलं आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की,'आई मला माफ कर, आता जगण्यात अर्थ वाटत नाही. हे जीवन मला नकोसे झालायं, भाऊ-आईची काळजी घे, माझे कागदपत्रे आणि एटीएम पीन, युपीआय नंबर माझ्या ऑफिसच्या एक नंबरच्या फाईलमध्ये असल्याचा' उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 


आणखी एक आत्महत्या...


सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असतानाच, दुसऱ्या एका घटनेत सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकुंदवाडीतील झेंडा चौकाजवळील रेल्वे पटरी जवळ एका 35 वर्षीय अनोळखी तरूणाने रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केले जात आहे. 


Aurangabad: कंपनीतील सुपरवायझर सतत लगट करण्याचा प्रयत्न करायचा, त्रासाला वैतागून कामगार महिलेची आत्महत्या