Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भरगच्च असे कार्यक्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच शिंदे गटात सामील झालेल्या सर्वच आमदारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सद्या मुख्यमंत्री सिल्लोडला पोहचले असून, त्याठिकाणी सुद्धा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री यांनी आपल्या दौऱ्यात सर्वात आधी म्हणजेच शनिवारी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात हजेरी लावली. यावेळी त्यांनी जाहीर सभा सुद्धा घेतली. तर या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूरू करण्यासाठी बोरनारे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
सत्तारांच्या मतदारसंघात सभा...
काही वेळापूर्वी मुख्यमंत्री हे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात पोहचले आहे. यावेळी शहरातील रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर स्वागतासाठी होर्डिंग लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर मुख्यमंत्री यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत स्वागत सत्तार यांच्या समर्थकांकडून करण्यात आले. सत्तार हे मंत्रीमंडळाच्या शर्यतीत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भुमरे, शिरसाट यांच्या कार्यालयालाही भेट...
बोरनारे आणि सत्तार यांच्या मतदारसंघातील भेटीनंतर मुख्यमंत्री हे आमदार संदिपान भुमरे, संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहे. यासाठी तिन्ही आमदारांकडून कार्यकर्त्यांची मोठी जमवा-जमवी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याची कोणतेही कसर राहणार नाही, याची खबरदारी बंडखोर आमदारांकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या औरंगाबाद दौऱ्यातील शक्तिप्रदर्शनाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
वाहतुकीतीत बदल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी शहरातील वेगवेगळ्या भागातील कार्यक्रमाना हजेरी लावणार आहे. आज रविवार असल्याने लोकांची रस्त्यावर गर्दीही जास्त असते. मात्र पोलिसांनी वाहतुकीतीत बदल केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावी लागणार असण्याची शक्यता आहे. तर अनेक मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.