Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका विधानाने मात्र सभेतील सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 'सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतले आणि तुम्ही लखपती झाले. मात्र मी लोकपती असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहे. आता दानवे यांनी विकास निधीच्या पैश्याचा उल्लेख केला की इतर कोणत्या पैश्याचा याची चर्चा सभेत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा बंडखोर आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. त्यातच दानवे यांनी अशाप्रकारे विधान केल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
आपल्या भाषणातून बोलतांना दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार साहेब, ज्यांना-ज्यांना तुम्हाला पक्षात आणायचे त्यांना पक्षात घ्या. तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतेले असल्याने तुम्ही लखपती झाला आहात. मात्र तरीही मी लोकपती असून, रुग्णालयात राहून सुद्धा निवडणून आलो असल्याचे दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. या सभेत बोलतांना ते म्हणाले की, मी आणि अर्जुन खोतकार किती जवळचे मित्र आहे हे सर्वांना माहित आहे. आतातरी एकत्र यावे असा टोला त्यांनी सत्तार आणि खोतकर यांना टोला लगावला. काही झाले तरी दानवे यांनी केलं असे म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी नको त्या माणसासोबत युती केली आणि एवढ सगळं घडले. आता हे नवीन आलेले सरकार हे अडीच वर्ष आणि पुढील पाच वर्षे काम करेल असेही दानवे यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंडखोर आमदारांकडून औरंगाबादेत जोरदार शक्तिप्रदर्शन
ईडीला घाबरुन कुणीही आमच्याकडे, भाजपकडे येऊ नये; एकनाथ शिंदे थेटच बोलले