Aurangabad News: एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बोनस गुण देऊ नका या मागणीसाठी औरंगाबादमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी आंदोलन सुरु केलं आहे. औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरात हे आंदोलन करण्यात येत असून, मोठ्याप्रमाणावर याठिकाणी विद्यार्थी एकत्र जमा झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या एनसीसीबाबतच्या जीआर विरोधात औरंगाबादमधील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी शहरातील टीव्ही सेंटर चौकात आंदोलन सुरु केले आहे. एनसीसी उमेदवारांना पोलीस भरतीत बोनस गुण देऊ नका हा इतर मुलांवर अन्याय असल्याचं या मुलांचे म्हणणं आहे. तर बोनस गुणऐवजी राखीव जागा द्या, त्याला आमचा विरोध नाही अशी भूमिका या मुलांनी घेतली आहे. याठिकाणी तब्बल अंदाजे 500 मुलांनी एकत्र आंदोलन सुरु केले आहे.
मुलांची मागणी...
एखाद्या मुलाला साडेसात गुण जास्त दिले तर आम्ही 140-145 गुण घेऊन सुद्धा नोकरीला लागू शकत नाही. आम्ही एकूण 149 मार्क घेतले आणि एनसीसी वाल्यांनी 143 घेतले तर त्याची टोटल 151 होते. त्यामुळे सर्वसाधारण मुलांनी काय करायचे काय, अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या तरुणांनी व्यक्त केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI