Aurangabad News: जी-20 परिषदेचा शिष्टमंडळ 27 आणि 28 फेब्रुवारीला औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान यावेळी 28 फेब्रुवारीला हे शिष्टमंडळ औरंगाबाद विद्यापीठ लेणी, बीबी का मकबरा आणि सोनेरी महालाला भेट देणार आहे. या अनुषंगाने पूर्व तयारी करण्याच्या हेतूने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण रस्त्याची सिटी बसमधून दौरा करत पाहणी करत सूचना केल्या आहेत. 


भारताला 2023 यावर्षी जी 20 आंतरराष्ट्रीय संघटनाचे अध्यक्षपद मिळाले आहे. याच निमित्ताने भारताच्या विविध शहरांमध्ये जी-20 संबंधित बैठका होत आहेत. औरंगाबाद शहरामध्ये 27 आणि 28 फेब्रुवारीला जी-20 अंतर्गत महत्त्वाच्या विमेन ट्वेंटीच्या बैठका होणार आहेत. यासाठी जगभरातून विदेशी पाहुणे औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. यानिमित्ताने औरंगाबाद शहराच्या वैभवी वारसा बद्दल व आपले पर्यटन गौरवाबद्दल या प्रतिनिधींना माहिती मिळावी म्हणून, एक सिटी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान याची पूर्वतयारी म्हणून, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या व इतर शासकीय, अशासकीय संस्थांचे अधिकाऱ्यांसोबत सिटी बसमध्ये प्रवास करून सिटी टूरच्या रूटचे सर्वेक्षण केले.


मनपा आयुक्तांनी दिल्या या सूचना... 



  • आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत सिटी बसमधून केलेल्या प्रवासात सर्वात आधी दिल्ली गेटला भेट दिली. यावेळी त्यांनी जाळ्यांना कलर करण्यास, दरवाज्यातल्या आतली व बाहेरची स्वच्छता करण्यास, झाड झुडूप काढून फुले लावून लॉन व्यवस्थित करण्यास, अतिक्रमण काढण्यास, केबल काढण्यास, नेम प्लेट व्यवस्थित करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले.


 



  • यासोबतच रस्त्यामध्ये येणाऱ्या रंगीन गेट, काला गेट, नौबत गेट भडकल गेट, बारापुला गेटवरील  अतिक्रमण काढणे, स्वच्छता करणे, वीज खांब शिफ्ट करण्याबाबत, जमीन बरोबर करण्यास, उद्यान व्यवस्थित करण्यास आणि रोषणाई व सिटी ऑफ गेट्स एलईडी बोर्ड व्यवस्थित कारणासाठी अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले. 


 



  • आयुक्तांनी रस्त्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी निवासाचे बाहेर, पोलीस आयुक्तालयच्या बाहेरच्या परिसराला स्वच्छ करून सौंदर्यीकरणबाबत सुद्धा यावेळेस निर्देश दिले. सिटी टूरच्या रस्त्यामध्ये पडणाऱ्या सर्व ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी, वर्टीकल गार्डन बसवण्यासाठी, रोड व्यवस्थित करून मार्किंग करण्यासाठी, स्वच्छता, रंगरंगोटी, डिव्हायडर नीट करण्यासाठी आदेश दिले. 


यांची होती उपस्थिती... 


आयुक्तांनी केलेल्या सिटी टूरमध्ये अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, उपायुक्त सोमनाथ जाधव, राहुल सूर्यवंशी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटी चे उप मुख्य अधिकारी सौरभ जोशी, आदित्य तिवारी, ऋषिकेश इंगळे, सिद्धार्थ बनसोड, भारतीय पुरातत्व विभागचे संजय रोहनकर, सहायक संचालक राज्य पुरातत्व विभागाचे अमोल गोटे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभागचे येरेकर, इंटॅकचे स्वप्निल जोशी, अमित देशपांडे, टूर गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे अजित कुलकर्णी, ए.सी.पी ट्रॅफिक, पी.आय गांगोर्डे, बेगमपुरा पी.आय विठ्ठल पोटे, आयसीआयसीआय बँकचे प्रतिनिधी, आयएचएमचे प्राध्यापक आनंद आयंगर, रूशाड कविना असे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जी 20 परिषदेचं शिष्टमंडळ देणार औरंगाबादच्या विद्यापीठ लेणी, मकबरा, सोनेरी महालाला भेट