Marathwada Dam Water Level: जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विभागातील प्रमुख 11 मोठ्या धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहचला आहे. तर देशातील सर्वात मोठं मातीच धरण असलेल्या जायकवाडी धरणात 72 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांची दुष्काळाची चिंता मिटली आहे.
कोणत्या धरण्यात किती पाणीसाठा
अ.क्र. | धरण | जलसाठा |
1 | जायकवाडी धरण | 72.46 टक्के |
2 | निम्न दुधना धरण | 67.88 टक्के |
3 | येलदरी धरण | 61.67 टक्के |
4 | सिद्धेश्वर धरण | 34.88 टक्के |
5 | माजलगांव धरण | 38.65 टक्के |
6 | मांजरा धरण | 33.20 टक्के |
7 | पैनगंगा धरण | 72.50 टक्के |
8 | मानार धरण | 100 टक्के |
9 | निम्न तेरणा धरण | 59.05 टक्के |
10 | विष्णूपुरी धरण | 64.20 टक्के |
11 | सिनाकोळेगाव धरण | 19.19 टक्के |
एकूण | 64.48 टक्के |
जायकवाडी 72 टक्के भरलं...
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 72.61 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी हा पाणीसाठा 35.48 टक्क्यांवर होता. धरणात अजूनही 45 हजार 892 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1576.258 दलघमी आहे. तर वरील आवक पाहता धरणाची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या...
Marathwada: मराठवाड्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; पंचनामे सुरु
Maharashtra Rain LIVE : राज्यात पावसाचं धुमशान सुरुच, पाहा ठिकठिकाणचं अपडेट्स एका क्लिकवर