Aurangabad Crime News: औरंगाबादच्या कॅनॉट परिसरात एका टोळक्याने राडा घातल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला. मोबाईल फायनान्सच्या पैश्यावरुन हा वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, दुसरा मारहाणीत बेशुद्ध झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील टोळक्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
औरंगाबादच्या कॅनॉट परिसरात एका टोळक्याकडून दोन तरुणांना मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आज दुपारची हि घटना असून, या टोळक्याने दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली आहे. मोबाईल फायनान्सच्या पैश्यावरुन झालेल्या वादातून ही मारहाण झाली आहे तर यात जखमी झालेल्या दोन्ही तरुणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र तोपर्यंत मारहाण करणारे टोळकं फरार झाला होता.
बेशुद्ध होईपर्यंत मारहाण!
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुणांना दहा ते बारा तरुणांचा टोळकं हातातील बेल्ट आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करतांना पाहायला मिळत आहे. खाली पडल्यावर देखील त्याला वरून बेदम मारहाण सुरूच होते. दोन्ही तरुण हात जोडून विनवणी करतात, मात्र तरीही मारहाण सुरूच होते. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत एक तरुण बेशुद्ध झाला आहे. तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. या दोन्ही तरुणांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.