Aurangabad:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (12 सप्टेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका माणसाला तब्बल दीड हजार रुपये दिले जात असल्याचा आरोपीही दानवे यांनी केला आहे. 


याबाबत बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. त्यासाठी रोहयो मंत्री संदीपान भुमरे गावोगावी जाऊन लोकांना येण्याची विनंती करत आहे. मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका, आशासेविका यांना सभेला येण्याचे अधिकृत पत्र काढले आहे. राजकीय सभेसाठी शासकिय कर्मचारी यांचा वापर केला जातोय. लोकांना आणण्यासाठी रेट कार्ड सुरु करण्यात आला आहे. सभेला येण्यासाठी दीड हजार रुपये दिले जात असल्याची माहिती मला मिळाली असल्याचं दानवे म्हणाले आहे. 


लहान मुलांना विकले जात असतानाही सरकर गप्प...


याचवेळी दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ईगतपुरी जवळ एक अदिवासी पाडा आहे. या ठिकाणी लहान मुलांना विकण्याच काम सुरु आहे. दीड वर्षांपुर्वी एका कंत्राटदाराला मुलगी विकण्यात आली. आता त्या मुलीचा मृत्यू झाला. मात्र सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तसेच सरकराने अद्याप कोणतीही भुमिका स्पष्ट केली नसल्याचं आरोप दानवे यांनी केला आहे. 


सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक... 


काल अतिवृष्टी संदर्भात तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. यावेळी तीन हेक्टरची मर्यादा केली आहेत. एनडीआरफची ही मदत वाढवली आहे. मग तरीही फक्त तीन हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकार असाताना दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात होती. यावेळी बागायतदार शेतकरी यांची संख्या कमी दाखवा अस आदेश सरकारने दिले असल्याचा आरोप सुद्धा दानवे यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


Aurangabad : मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा? प्रशासनाने काढले अजबच पत्र


Aurangabad: आमदार बंब यांच्या विरोधात काढलेल्या शिक्षकांच्या मोर्च्याला सुरवात; या आहेत प्रमुख मागण्या