Aurangabad : औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या (Bindas Kavya) शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70  सबस्क्राईबर वाढले. 


यूट्युबर बिंदास काव्या शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिच्या आई-वडिलांनी आधी परिसरात शोध घेतला. त्यानंतर मित्रमंडळी यांनाही संपर्क केला, मात्र काव्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. पुढे तिच्या घरच्यांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जाऊन पाहणी करत, विचारपूस केली. मात्र तिथेही काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने अखेर काव्याला शोधून काढले. 


एका दिवसांत वाढले 70 हजार सबस्क्राईबर...


बिंदास काव्या प्रसिद्ध यूट्युबर आहेत. यु ट्यूब आणि इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आणि सबक्रायबर्स आहेत. त्यामुळे काव्या बेपत्ता होताच याची चर्चा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर झाली. दरम्यान पाहता-पाहता काव्याचे फॉलोवर्स आणि सबक्रायबर्स आणखी वाढू लागले आहे. यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्रायबर्स असणाऱ्या काव्याचे एक दिवसांत 70 हजार सबस्क्राईबर वाढून आता 4.4  मिलियन सबक्रायबर्स झाले आहेत. तर इंस्टाग्रामवर सुद्धा तिचे 1  मिलियन फॉलोवर्स आहेत. 


सबस्क्राईब करायला मोजावे लागतात पैसे...



  • काव्याला जर सपोर्टर म्हणून जॉईन करायचे असेल, तर महिन्याला 89  रुपये मोजावे लागतात. 

  • काव्याचा जर फॅमिली फ्रेंड व्हायचे असेल तर 159 रुपये महिना लागतात.

  • जर काव्याचा माय सुपर फ्रेंड व्हायचा असेल तर 299 रुपये मोजावे लागतात.

  • जर काव्याचा सुपर लव व्हायचं असेल तर तब्बल 799 महिन्याला मोजावे लागतात. 


अखेर काव्या सापडली... 


काव्या बेपत्ता झाल्याची पोलिसात नोंद होताच, पोलिसांनी तिच्या शोध घेण्यासाठी यंत्रणा हलवली. औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आरपीएफच्या मदतीने तिला शोधून काढले आहे. काव्याच्या पालकांनी दिलेले माहीती आणि सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने तपास केल्यानंतर ती महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशकडे रेल्वेने जात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानुसार तपास करून रेल्वे विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांना संपर्क साधला. औरंगाबाद शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नानंतर तिला शोधण्यास आरपीएफला यश मिळाले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


PHOTO : मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या कोण आहे? कोट्यवधी लोक जिचे व्हिडीओ पाहतात


YouTuber Bindas Kavya : बेपत्ता असलेली प्रसिद्ध युट्युबर अखेर सापडली , कुठे आणि कशी सापडली काव्या?