Aurangabad News: गेल्या पावणेचार वर्षात औरंगाबाद महानगरपालिकेच्या नागरिक मित्र पथकाने 55 हजार जणांवर कारवाई करत तब्बल 3 कोटी 65 लाखांचा दंड वसूल केला आहे. ज्यात सर्वाधिक दंड विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांकडून वसूल करण्यात आला आहे. त्यांनतर दुसऱ्या क्रमांकावर प्लास्टिक विरोधात केलेल्या कारवाईतून दंड वसूल करण्यात आला आहे. तर आता नागरिक मित्र पथकाकडून 'सिंगल युज प्लास्टिक' चा वापर, विक्री आणि उत्पादन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. 

अशी झाली दंडात्मक कारवाई 

अ.क्र. कृत्य  किती जणांना दंड  किती रक्कम वसूल 
1 विनामास्क  28,408 1,42,04,000
2 प्लास्टिक  5636 1,24,88,700
3 थुंकणे,कचरा जाळणे  19533 72,61,000
4 बांधकाम साहित्य  709 14,95,900
5 जैविक कचरा फेकणे  274 7,31,000
6 मांजा, पंतग  5 25,000
7 क्लासेसचे पोस्टर  103 2,63,500
8 पाण्याची नासाडी  571 57,100

सर्वाधिक कारवाई विनामास्क विरोधात...

औरंगाबाद महानगरपालिकेच्या नागरीक मित्र पथकाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक कारवाई विनामास्कच्या विरोधात आहे. ज्यात 28 हजार 408 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 कोटी 42 लाख 4 हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. तर आता याच पथकाने 'सिंगल युज प्लास्टिक'चा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरवात केली आहे.