Aurangabad Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान जिल्ह्यात बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 63 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील 15 टक्के नागरिकांनी अजूनही लसीचा पहिला डोस घेतला नाही. 

जिल्ह्यातील पहिल्या-दुसऱ्या डोसची आकडेवारी

तालुका  उदिष्ट  पहिला डोस  दुसरा डोस 
औरंगाबाद तालुका (ग्रामीण) 3,62,797 3,46,315 2,45,861
औरंगाबाद शहर  11,70,907 9,82,591 7,61,653
गंगापूर  3,64,323 3,28,499 2,37,887
खुलताबाद  1,09,236 91,604 71,238
फुलंब्री  1,50,741 1,26,155 1,05,653
सोयगाव  1,09,617 90,950 71,752
पैठण  3,29,282 2,68,828 2,06,108
वैजापूर  2,98,329 2,41,484 1,87,009
कन्नड  3,27,533 2,63,946 2,12,158
सिल्लोड  3,53,973 2,80,198 2,27,303

रविवारी 47 रुग्णांची वाढ...

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 47 नवीन रुग्णांची वाढ झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर 66 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 369 रुग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांची भर पडणे सुरूच असून, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केलाय जात आहे.