Aurangabad News: औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर शहरातील आतापर्यंत 2 हजार 571 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे. दरम्यान याचवेळी औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. ज्यात आतापर्यंत या सर्वेक्षणात शहरात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर अनधिकृत नळ कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिका प्रशासनाला दिलेल्या आदेशानंतर मनपाने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. महापालिकेचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले जात आहे. प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन नळ कनेक्शनची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सर्वेक्षणाचे सुमारे नव्वद टक्के काम झाले असून, त्यात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत.


महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 67 हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले आहेत. त्यामुळे आता यातील व्यावसायिक आणि निवासी कनेक्शनची संख्या वेगवेगळी काढण्याचे काम सुरू आहे. यातील मुख्य जलवाहिन्यांवर असलेले व्यावसायिक नळ कनेक्शन कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उर्वरित नळ कनेक्शनबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.


आतापर्यंत 2 हजार 571  कनेक्शन खंडीत...


गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील 2 हजार 571 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले आहेत. तर यादरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ तोडण्याची मोहीमही हाती घेतली आहे. ज्यात मे ते डिसेंबर 2022 दरम्यान 2 हजार 571 अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आले. त्यातील 1 हजार 509 नळ कनेक्शन नंतर शुल्क आकारून नियमित करण्यात आले.


मुख्य जलवाहिनीवरील आणखी 11 कनेक्शन खंडीत...


औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहे. यासाठी मनपाने विशेष पथकांची नियुक्ती केली होती. दरम्यान मंगळवारी देखील अशीच कारवाई करण्यात आली. कटकट गेट येथून दिल्ली गेट ते हत्तीसिंह पुरा जलकुंभ भरणा करणारी 300 मिमी मुख्य फीडर जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. ज्यात रवींद्रनगर, कटकट गेट इथे एकूण 11 नळ जोडणी खंडित करण्यात आल्या. यातून अनधिकृतपणे रोज 24 तास पाणी पुरवठ्याचा लाभ घेण्यात येत होता.


मोठी बातमी! औरंगाबादमध्ये कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार