Aurangabad News: प्रत्येकाच्या आयुष्यात जोडीदाराचे एक विशेष महत्व असते. तसचं काही प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा असते. मात्र औरंगाबाद येथील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात (siddharth garden and zoo) अनेक प्राणी एकाकी जीवन जगत आहे. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळण्यासाठी महापालिकेने देशातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे विचारणा केली होती. त्यानुसार अखेर अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने औरंगाबाद महापालिकेला हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बाब आहे. 


औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान मराठवाड्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाचे समजले जाते. या उद्यानात रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. विशेष म्हणजे याच उद्यानात असलेल्या प्राणिसंग्रहालयांला भेट देणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. मात्र असे असताना उद्यानात असलेले इमू, सायाळ, स्पूनबिल पक्षी आणि कोल्हा हे गेल्या दिवसांपासून एकाकी जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळण्यासाठी महापालिकेने देशातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे विचारणा केली होती. त्यानुसार अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने औरंगाबाद महापालिकेला हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यासाठी काही कायदेशीर प्रकिया पूर्ण झाल्यावर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात एकाकी जीवन जगणाऱ्या प्राण्यांना जोडीदार मिळणार आहे. 


सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे परवानगी मागणार...


प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यातील बहुसंख्य प्राणी हे एकापेक्षा जास्त संख्येने आहेत. परंतु सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे एकेकच प्राणी आहेत. त्यांना जोडीदार नसल्याने ते एकाकी जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार आणण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत होती. त्याच्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असून, अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने औरंगाबाद महापालिकेला हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यासाठी सेंट्रल झू ऑथॉरिटीची (Central Zoo Authority) परवानगी लागत असते. त्यानुसार आता महानगरपालिकेकडून सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे प्राण्यांच्या हस्तांतरणाबाबत परवानगी मागण्यात येणार आहे.


बदल्यात वाघ देण्याची विनंती...


सिद्धार्थ उद्यानातील काही प्राण्यांना जोडीदार नसल्याने देशभरातील प्राणिसंग्रहालयांकडे या प्राण्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महानगरपालिकेकडून विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे हे प्राणी अधिक संख्येने आहेत. त्यामुळे त्यांनी हे प्राणी देण्यास तयार असल्याचे कळविले आहे. मात्र सोबतच त्याबदल्यात औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातील वाघाची जोडी किंवा एखादा वाघ मिळावा अशी विनंतीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता महानगरपालिका आणि सेंट्रल झू ऑथॉरिटी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


PIT Line: औरंगाबादकरांची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन


सत्तारांच्या वक्तव्याने शिंदे गट-भाजपा युती की मैत्रीपूर्ण लढत? भाजप राजकीय कुस्तीच्या तयारीत, रावसाहेब दानवेंचा टोला