Aurangabad News: एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. त्यातच दोन्ही गटाकडून एकेमकांवर आरोप केले जात आहे. खरी शिवसेना कुणाची यावरून सुद्धा वेगवेगळे दावे केले जात आहे. दरम्यान शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'लढतोय एकटा तो,वैराची रात आहे, पुरून उरेल त्यांना, वाघाची जात आहे', असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे. 


अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबुकवर पेजवर पोस्ट करत म्हंटले आहे की, 'लढतोय एकटा तो, वैराची रात आहे. फितुर निघुन गेले, निष्ठेची साथ आहे. केला घात म्हणूनी, मागे हटणार नाही. पुरून उरेल त्यांना, वाघाची जात आहे, असं दानवे म्हणाले.



न्यायालयाने सर्वकाही बारकाईने आयकलं


शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवर बोलतांना दानवे म्हणाले, ज्या बाजू सक्षमपणे मांडायच्या आहेत, त्या शिवसेनेने न्यायालयात मांडलेल्या आहेत. न्यायालयाने सर्वकाही बारकाईने आयकलं असून,त्यांचे निरीक्षण सुद्धा नोंदवले आहे. त्यामुळे निश्चीतच सुप्रीम कोर्ट आणि त्यांनी निर्माण केलेलं घटनापीठ शिवसेनेतून ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई करू शकेल. तसेच शिवसेनेला चांगल्याप्रकारे न्याय देऊ शकेल. विषय शिवसेनेला न्याय मिळणे हा नसून, भारतात जी लोकशाही आहे ती आणखी मजबूत करणे आणि कायद्याच्या बाजू आणखी सक्षम करण्याचे सुप्रीम कोर्ट या सुनावणीच्या दरम्यान करेल अशीच सर्वांची भावना असल्याचं दानवे म्हणाले. 


योग्य निर्णय होईल...


पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, जे काही चालू आहे ते योग्यप्रकारे सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे योग्य ती बाजू घेतील, योग्य ती बाजू आयकतील आणि योग्य ते निर्णय देतील. शिवसेनेच्या वकिलांनी अतिशय योग्य बाजू मांडल्या आहे. ही बाजू फक्त एकट्या शिवसेनेच्या हिताची नसून, देशाच्या आणि देशाच्या लोकशाहीच्या हिताची आहे. त्यामुळे यातून जो काही निर्णय येईल तो देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण राहील असेही दानवे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय पेच; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार


Maharashtra Politics : राज्यातील राजकीय पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडले, युक्तिवादात कोणते मुद्दे? जाणून घ्या