Aurangabad Crime News: औरंगाबादच्या ग्रामीण भागातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. अशा गुन्हेगारांविरूध्द कठोर भुमिका घेत थेट एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. जिल्हयातील गुन्हेगारी कारवाई करणाऱ्या सलग तिसरा आरोपीला एमपीडीए कायद्याखाली हर्सुल कारागृहत स्थानबध्द करण्यात आले आहे. रामदास विठ्ठल वाघ (वय 33 वर्षे रा. केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण हद्दीतील रामदास विठ्ठल वाघविरूध्द यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहे. दारू विक्री, महिलांचे विनयभंग करणे, लोकांना मारहाण करण्यासारखे त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. तर दारू पिण्यासाठी लोकांना धमकावुन पैसे मागणे आणि नाही दिल्यास त्यांना मारहाण करून दहशतीचे वातारण निर्माण करण्याच्या त्याच्या विरोधातील तक्रारी वाढल्या होत्या. दरम्यान या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याच्याविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु त्याच्यावर याचा काहीच परिणाम होत नव्हता. 


अनेकदा पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर सुद्धा रामदास वाघच्या गुन्हेगारी वृतीत सतत वाढ होत चालली होती. त्याच्या या दहशतीमुळे अनेकदा नागरिक पोलिसात जाण्याची हिम्मत सुद्धा करत नव्हते. त्यामुळे अखेर पोलीसा अधीक्षक यांनी एमपीडीए कायद्यानुसार त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला प्रस्ताव...


रामदास वाघच्या गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. अखेर जिल्हाधिकारी यांनी आज वाघ विरूध्द एम.पी.डी.ए कायद्यानुसार स्थानबध्दतेचा आदेश काढला आहे. 


यापुर्वी दोघांना केलं स्थानबद्ध...


औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून एम.पी.डी.ए कायद्यानुसार सलग तिसरी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस ठाणे पाचोड हद्दीतील सराईत गुन्हेगार अमोल जगन्नाथ चिडे (वय 27 वर्षे रा. मुरमा ता. पैठण जि. औरंगाबाद) आणि पोलीस ठाणे  शिल्लेगाव हद्दीतील सनव येथील कुख्यात वाळु माफिया  मुजीब अब्दुल शेख (वय 34 वर्षे रा. सनव ता. गंगापुर जि. औरंगाबाद) यांना एक वर्षेसाठी स्थानबध्द करण्याची कारवाई करण्यात आली होती.


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: दहीहंडीनिमित्ताने औरंगाबाद शहरातील 'हे' मार्ग राहणार बंद; पोलिसांनी सुचवले पर्यायी...


Aurangabad Crime: कामावरून काढले म्हणून 'तो' मालकाच्या घरात थेट तलवार घेऊन घुसला