Aurangabad News: दहशतवादी पकडण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या मॉकड्रिलमधून मुस्लिमद्वेष पसरवण्याचे चित्र निर्माण केल्याप्रकरणी दाखल फौजदारी जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी गृहमंत्रालय, पोलिस महासंचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद ओसामा अब्दुल कदीर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत विशेष समुदायातील संबंधित व्यक्तीचे दहशतवादी म्हणून चित्रण दाखवणारे मॉकड्रिल केले जाणार नाही, असे प्रतिबंधित आदेशही न्यायालयाने आहेत. याबाबत पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी शासनाकडून अॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले तर, याचिकाकर्ते सय्यद ओसामा अब्दुल कदीर याची बाजू अॅड. सय्यद तौसीफ यासिन यांनी मांडली.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराच्या माळीवाडा बस स्थानकात पोलीस मॉकड्रिल झाले होते. यावेळी पोलीस शिपाई अतिरेकी भूमिका बजावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र यावेळी अतिरेकीच्या भूमिकेतील व्यक्ती "नारा ए तकबिर अल्लाहु अकबर' चे घोषणा जोराने ओरडत असल्याचे दिसून आले होते. तर याच घोषणेवर औरंगाबादच्या ओसामा कादिर मौलाना यांनी आक्षेप घेतला आहे. धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान यावरच आक्षेप घेत ओसामा कादिर मौलाना यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तर याप्रकरणी न्यायालयाने गृहमंत्रालय, पोलिस महासंचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्ते यांच्या मागण्या!
- मुद्दाम मुस्लिमांना दहशतवादी म्हणून दाखवणे हे स्पष्टपणे पोलिसांचा मुस्लिम द्वेष व समाजाविरुद्धचा पक्षपातीपणा दर्शवते आणि दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा संदेश जातो.
- पोलिसांचे हे बेकायदेशीर कृत्य एखाद्या व्यक्तीला सन्मानाने जगण्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करते.
- पोलिसांचे हे कृत्य देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करणारे आहे.
- पोलिसांच्या अशा कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या विश्वासाला तडा जातो.
- "नारे तकबीर, अल्लाहू अकबर"च्या घोषणा देत होता. या घटनेच चित्रीकरण समाजमाध्यमामध्ये पसरले, जात आहे.
- संबंधित चित्रीकरण पाहिल्यानंतर अतिरेकी हा मुस्लिम समाजाचाच असतो हा गैरसमज लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी जाणूनबुजून दाखविले गेले होते.
- त्यामुळे यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोडला एकाच दिवशी दोन मृतदेह सापडले; परिसरात खळबळ