Marathwada Teacher Constituency Election: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान मराठवाडा (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी दिली. तर उद्या 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्जाची छाननी होणार आहे.
राज्यातील पाच जागांसाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणुका पार पडतायात. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. तर नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे किरण पाटील (Kiran Patil), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विक्रीम काळे (Vikram Kale) यांच्यासह वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखले केले आहेत. तसेच उद्या 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्जाची छाननी होणार आहे.
असा रंगणार सामना!
गेली अनेक वर्षे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, मागील अठरा वर्षांपासून विक्रम काळे हे या मतदारसंघाचा नेतृत्व करतायत. आता पुन्हा एकदा त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात उतरवला आहे. भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच सामना या मतदारसंघात होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन!
दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून मोठ्याप्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. बुधवारी माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, तर अजित पवारांनी प्रचार सभा देखील घेतली. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गट आणि भाजपचे मंत्री उपस्थित होते. तसेच यावेळी रॅली काढून, सभा घेण्यात आली.
संबंधित बातम्या:
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती ठरल्या, 5 मतदारसंघात कोण-कुणाविरुद्ध भिडणार?