Auranagabad Crime News : औरंगाबाद शहर खुनाच्या घटनांनी हादरले आहे. गेल्या 24 तासात शहरात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन भागात भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकतर्फी  प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग ( वय 22 वर्षे ) असे मृत हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत असलेल्या ग्रंथीचा आज देवगिरी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात मृतदेह आढळून आला आहे. तर या तरुणीच्या अंगावर जखमा पाहायला मिळून आले आहेत. धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून हा खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून आरोपीच्या शोधात पथक तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी  शहरातील नारेगाव भागात एका तरुणीचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणीचा खून झाल्याने शहर हादरले आहे. 


पोलीस आरोपीच्या शोधात... 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी आणि आरोपी दोन्ही एकाच समाजातील असून दोन्ही एकमेकांना चांगले ओळखत होते. खुनाची घटना समोर येताच पोलिसांचे चार पथक आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. तर मुलीचा मृत्तदेह उत्तर तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात अली आहे. 


तरुणीच्या हत्येनंतर आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल; 24 तासात तीन खून 


मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' होण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारण गेल्या 24 तासात शहरात तीन खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून चाकू भोसकून भर दिवसा हत्या करण्यात अली आहे. तर आणखी दोन वेगवगेळ्या घटनेत सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात असून पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे. पहली घटना शहरातील कटकटी गेट भागात पाहायला मिळाली. शुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यांनतर 19 वर्षाच्या फरहान खान निजाम खान नावाच्या तरुणाने साबिर शहा कासीम शहा ( वय 36, वर्षे रा. नेहरूनगर ) नावाच्या व्यक्तीला धारदार हत्याराने भोसकले. तर त्यांनतर जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर बियरच्या फुटलेल्या बाटलीच्या काचने गळा चिरून हत्या केली आहे. शेख नासिर शेख बशीर वय ( 38 ) असे मृत व्यक्तीचे नाव असून फय्याज  राजू पठाण असे आरोपीचे नाव आहे.