Aurangabad News: राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे हे आज सकाळी आपल्या मतदारसंघात परतले आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ढोल-ताशे आणि आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी बोरणारे यांचे स्वागत केले. 


काय म्हणाले बोरणारे...


सत्तांतरानंतर पहिल्यांदाचा मतदारसंघात परतल्यावर माध्यमांशी बोलताना बोरणारे म्हणाले की,  गेली तीस वर्षे मी शिवसेनेत आहे. गेल्या पंधरा दिवसात काय घडलं आणि का घडलं हे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुळात मी हा निर्णय फक्त तालुक्याच्या विकासाठी घेतला. मला एक लाख लोकांनी निवडून दिले त्यांच्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. एक लक्षात घ्या एकाचवेळी 50 आमदार जात असतील तर ही काहीतरी समजण्यासारखी गोष्ट आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोष देणार नाही. मात्र त्यांच्या बाजूला असलेल्या चार बडव्यांना मात्र दोष देईल. कारण याच लोकांनी आमच्यासारख्यांना बाजूला करण्याचे काम केले. त्यामुळे हा आमचा बंड नसून, उठाव असल्याची प्रतिक्रिया आमदार बोरणारे यांनी दिली.


भुमरेही परतणार...


ज्याप्रमाणे बोरणारे आज सकाळी जिल्ह्यात परतले आहेत, त्याचप्रमाणे पैठणचे आमदार संदिपान भुमरे सुद्धा आज संध्याकाळी 4 वाजता आपल्या मतदारसंघात दाखल होणार आहे. भुमरे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. तर विमानतळावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सामील झाल्यावर आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भुमरे पहिल्यांदाचा जिल्ह्यात परत येत आहे. त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित बातम्या


Ehnath Shinde : शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे? मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल व्हायचे; एकनाथ शिंदे यांचा घणाघात


पक्ष सोडणाऱ्यांना भावनांना हात घालणारं भाषण करावं लागतं; मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणाला राऊतांचं उत्तर