Aurangabad News: औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरून आज एमआयएमकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादीवर निशाणा साधला.भाजप-शिवसेनेची सत्ता असतांना जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले नाही. औरंगाबाद जिल्ह्याचा एक इतिहास आहे. परंतु हा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रेमापोटी घेण्यात आला नसल्याचे जलील म्हणाले.
यावेळी जलील म्हणाले की, लोकं म्हणतात किती लोकं येणार पण लक्षात ठेवा कुणी येऊ किंवा नाही पण जलील सर्वात आधी पुढे असणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून भाजप-शिवसेने याच मुद्यावरून आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या आहे. आज खुर्ची जात असतांना शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याची टीका जलील यांनी केली.
युती असतांना का निर्णय घेतला नाही..
2014 मध्ये शिवसेना-भाजपची सरकार असताना का निर्णय घेतला नाही. मात्र आज खुर्चीसाठी निर्णय घेतला जात आहे. त्यांना वाटत असेल की हा निर्णय आता सर्वांना मान्य करावे लागले तर आयकून घ्या, हा देश जर चालणार असेल तर ते बाबासाहेब आंबेकर यांच्या संविधानाने चालणार असल्याचे जलील म्हणाले.
पवारांवर टीका...
यावेळी बोलतांना जलील म्हणाले, जेव्हा औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला त्यावेळी, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आल्याच शरद पवार म्हणाले होते. आम्ही सुद्धा त्यात होतो असेही पवार म्हणाले. मात्र त्यांनतर शरद पवार काल औरंगाबादमध्ये असतांना म्हणाले की, आम्हाला माहितच नाही काय ठराव घेतला. आम्हाला याबाबतीत काहीच माहित नसल्याचेही म्हणाले. त्यामुळे माझं म्हणणे आहे की, झूठ बोले कव्वा काटे' अशा शब्दात जलील यांनी पवारांवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
Aurangabad Renamed: नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत; संभाजी ब्रिगेड आक्रमक
Aurangabad Rename: MIM च्या नेत्यांनी कबुल करावं, औरंगजेब त्यांचा बाप होता: अंबादास दानवेंचा घणाघात