Aurangabad News: औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात एमआयकडून काढण्यात आलेला मोर्चा आमखास मैदानात पोहचला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोर्च्याला सुरवात झाली. भडकल गेटपासून निघालेला मोर्चा आता आमखास मैदानावर पोहचला असून, नेत्यांचे भाषण सुरु झाले आहेत. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा नाव बदलू नयेत अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे.


मोर्च्यात तरुण हातात तिरंगा झेंडे घेऊन सहभागी झाले होते.मूक मोर्चा असल्याने घोषणाबाजी करण्यात आली नाही. तसेच मोर्चेकरी तरुणांच्या हातात मी औरंगाबादकर असे होर्डिंग पाहायला मिळाले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलू नयेत अशी यावेळी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मोर्च्यात अनेक संघटनेचे पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांनतर मोर्चा आता आमखास मैदानावर पोहचला असून, विविध नेत्यांचे भाषण सुरु झाले आहेत. त्यांनतर सर्वात शेवटी इम्तियाज जलील यांचे भाषण होणार आहे. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


नामांतराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या दृष्टीने औरंगाबाद शहर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भडकल गेट ते आमखास मैदान या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस तैनात असल्याचे पाहायला मिळाले. तसेच एसीपी-डीसीपी दर्जाचे अधिकारी मोर्च्याच्या प्रत्येक घडामोडीवर स्वतः उपस्थित राहून लक्ष ठेवत आहे. तसेच पोलीस आयुक्त हे देखील मोर्च्यावर लक्ष ठेवून आहे. गेल्यावेळी एमआयएमकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यात उडालेला गोंधळ पाहता यावेळी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे