Marathwada Dam Water Level: जुना महिना उलटून आठवडा झाला असतांना मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणात आजघडीला 41 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर यातील सर्वात मोठं धरण समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व अकरा धरणात सद्या 2 हजार 119 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात मोठ्या पावसाची गरज आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
अ.क्र. | धरण | पाणीसाठा | टक्केवारी |
1 | जायकवाडी | 733 दशलक्ष घनमीटर | 33 टक्के |
2 | निम्न दुधना | 140 दशलक्ष घनमीटर | 57 टक्के |
3 | येलदरी | 737 दशलक्ष घनमीटर | 54 टक्के |
4 | माजलगाव | 97 दशलक्ष घनमीटर | 31 टक्के |
5 | मांजरा | 49 दशलक्ष घनमीटर | 27 टक्के |
6 | ऊर्ध्व पैनगंगा | 499 दशलक्ष घनमीटर | 51 टक्के |
7 | विष्णुपुरी | 56 दशलक्ष घनमीटर | 70 टक्के |
8 | निम्न मनार | 45 दशलक्ष घनमीटर | 32 टक्के |
9 |
निम्न तेरणा |
45 दशलक्ष घनमीटर | 49 टक्के |
10 |
सिना कोळेगाव |
14 दशलक्ष घनमीटर | 16 टक्के |
गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रमाण कमीच...
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे आतापर्यंत प्रमाण कमीच आहे. गेल्यावर्षी जून ते चार जुलैपर्यंत या 11 धरणांच्या क्षेत्रात 2 हजार 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यावेळी या तारखेपर्यंत 1 हजार 735 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.