Aurangabad Crime News: ऑनलाईन मेट्रिमोनिअल साईटवर ओळख झालेल्या औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) एका व्यापाऱ्याने मध्य प्रदेशातील जबलपूर येथील विधवेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील विजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत सुरेंद्र गुप्ता (रा. एन 1, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या औरंगाबादेतील व्यापाऱ्याचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील एका व्यापाऱ्याने ऑनलाईन मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख झालेल्या मध्य प्रदेशातील जबलपूर येथील विधवेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार केले. एवढंच नाही तर या महिलेकडून या व्यापाऱ्याने 10 लाख 50 हजार रुपयेसुद्धा उकळले. धक्कादायक म्हणजे विधवेचा अपघात झाल्यानंतर देखील आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच  त्यानंतर विधवेला लग्नास नकार देत दोघांचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलिसात धाव घेत बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. 


अपघातात जखमी असताना केला अनैसर्गिक अत्याचार 


याबाबत पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने एक 'मॅट्रिमोनिअल साईटवर लग्नासाठी नोंदणी केली होती. त्या ठिकाणी मार्च 2012 मध्ये समित गुप्ता याने रिक्वेस्ट पाठविली. त्यानुसार दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केला. त्यानंतर दोघांत फोनवर संभाषण सुरू झाले. तेव्हा सुमित गुप्ता याने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट होणार असून, तू मला आवडत असल्यामुळे आपण विवाह करू असे आश्वासन पीडितेला दिले. त्यानंतर पीडितेला भेटण्यासाठी तो जबलपूरला गेला. लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर दोघांमध्ये 13 मे 2012 रोजी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. धक्कादायक म्हणजे अपघातात जखमी असताना आरोपीने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने केला गुन्हा दाखल 


आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत महिलेकडून 10 लाख 50 हजार रुपये घेतले होते. मात्र महिलेचा अपघात झाल्यावर तिला शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत असल्याने तिने पैशांची मागणी केली. मात्र आरोपीने पैसेही देणार नाही आणि विवाहसुद्धा करणार नाही, अशी धमकी तीला देऊ लागला. तसेच दोघांचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. दरम्यान आरोपी हा पीडितेला भेटण्यासाठी 1 फेब्रुवारीला जबलपूरला गेला. तो येताच पीडितेने विजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच जबलपूर पोलिसांनी आरोपी सुमीतला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी न्यायालय कोठडीत कारागृहात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Police: औरंगाबाद शहर पोलिसांकडून 'मिशन वॉन्टेड' मोहीम; आतापर्यंत 554 आरोपींना ठोकल्या बेड्या