Aurangabad Crime News: औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली असून, एका हॉटेल मालकाला आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कारासाठी (Rape) आईनेच संमती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अजिंठा पोलिसात आई आणि अत्याचार करणाऱ्या हॉटेल मालकाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आईची रवानगी हर्सूल कारागृहात (Harsul Jail) केली असून, फरार हॉटेल मालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे या अल्पवयीन मुलीच्या आईने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. तक्रारीची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत मुलीला गुजरातच्या राजकोटमधून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अजिंठा पोलीस ठाण्यात आणून, तिची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
अत्याचारासाठी आईनेच दिली संमती
संबधीत मुलीला महिला अंमलदारामार्फत पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता, बाळापूर (ता. सिल्लोड) येथील हॉटेल व्ह्यू पॉइंटचा मालक सलीम मलिक (वय 70) याने तिच्या आईच्या संमतीवरून तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. पीडित मुलीची आई आरोपीच्या हॉटेलमध्ये कपडे धुण्याचे काम करण्यासाठी म्हणून तिला सोबत नेत होती. त्यानंतर आईच्या संमतीवरून आरोपी सलीम हा पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार करायचा. त्यामुळे या मुलीच्या जवाबावरून आई आणि हॉटेल मालक सलीम मलिक विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
म्हणून मुलगी प्रियकरासोबत गेली पळून...
आई सोबत हॉटेलमध्ये जाणाऱ्या पीडित मुलीची राहुल दिलीप निभोरे (वय 21 वर्षे) सोबत ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र आईकडून सतत हॉटेल मालकाच्यासोबत बळजबरी संबंध ठेवण्यास भाग पडण्याचा दबाव सुरु असल्याने पीडित मुलगी या अत्याचारामुळे त्रस्त झाली होती. त्यातच आई आपल्या मनाविरोधात लग्न लावण्याची तयारी करत असल्याची कुणकुण तरुणीला लागली होती. त्यामुळे तिने आपला प्रियकर राहुल दिलीप निभोरेसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आधी पुणे आणि त्यानंतर राजकोट येथे दोघेही पळून जाऊन एकत्र राहू लागले होते.
प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल...
आईकडून होणार अत्याचार आणि मनाविरोधात लग्नाची भीतीने पीडित मुलगी आपला प्रियकर राहुल निभोरेसोबत पळून गेली होती. मात्र याच काळात प्रियकरासोबत एकत्र आल्यावर दोघांमध्ये शाररिक संबंध आल्याने व मुलगी अल्पवयीन असल्याने राहुल विरोधात बलात्कारसह बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलमानुसार अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने आत्महत्या केल्याचं कळताच पतीचाही गळफास, नवविवाहित दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा