Aurangabad Crime News: औरंगाबादच्या एका नामांकित वाहनाच्या शोरूममध्ये दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या दुचाकी आणि चारचाकीच्या नामांकित पगारिया ऑटो शोरूममध्ये पाच दरोडेखोरांनी दरोडा घातला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पथक पोहचले असून, पंचनामा करण्यात येत आहे. 


रात्री दीड वाजेच्या सुमारास पाच जणांनी शोरूमचे शटरचे कुलूप तोडून शटर उघडले. त्यांनतर शोरूमच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आतमध्ये ठेवलेल्या दोन तिजोऱ्या सोबत घेऊन गेले. ज्यात 15 लाख रुपये होते. पुढे जाऊन त्यातील पैसे काढून छावणीच्या पुलाजवळ खाली तिजोऱ्या फेकून पसार झाले. एकूण पाच आरोपी असून, पाचही जण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 


घटनास्थळी पोलीस...


पगारिया ऑटो शोरूम मध्ये पडलेल्या दरोड्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुन्हे शाखेसह श्वानपथकाला सुद्धा बोलवण्यात आले आहे. तर पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून, सीसीटीव्हीत कैद झालेल्या दरोडखोरांचा शोध घेण्यात येत आहे.