Aurangabad News: रक्ताच्या नात्यापलीकडे सुद्धा काही मानेलेली नाते असतात जे सख्या नात्यांपेक्षा अधिक घट्ट असतात. मात्र औरंगाबादमध्ये याच नात्याला काळीमा फासणारी घटना 2011 मध्ये औरंगाबादमध्ये समोर आली होती. मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन बहिणीवरच एका नराधमाने मित्रांच्या मदतीने अत्याचार केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आता न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 62 हजार रुपये दंड ठोठावला. रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्लादादा (२३, रा. भावसिंगपुरा) असे या आरोपीचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरुणीच्या आई- वडिलांचे निधन झाले असून, परिचारिका असलेली मोठी बहीण तिचा सांभाळ करते. पीडिताची मोठी बहिणीचा आरोपी रामदास मानलेला भाऊ आहे.  दरम्यान 31 ऑगस्ट 2011 रोजी पीडिता घरी एकटीच होती. सकाळी रामदास पीडितेच्या घरी आला. नेहमीप्रमाणे पीडिताला पोलीस भरतीची ट्रेनिंगसाठी घेऊन गेला. त्यांनतर पीडिता व रामदास दर्गा रोडपर्यंत पायी आले. तेथे आरोपीचे दोन मित्र कारमध्ये होते. तिला कारमध्ये बसवून राजेशनगरातील इमारतीत नेऊन अत्याचार केला. तसेच मोबाइलमध्ये केलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला घरी आणून सोडले होते. 


आठवड्यापूर्वीच बांधली होती राखी....


पीडिताच्या मोठ्या बहिणीला रामदास आपली मानलेली बहिण मानायच. त्यामुळे रामदासच त्यांच्या घरात नेहमी येणेजाण सुरूच असायचं. दरम्यान घटनेच्या एक आठवड्यापूर्वीच रक्षाबंधनाच्या दिवशी रामदासन पीडितेकडून राखी बांधून घेतली होती. ओवाळणीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मात्र, तुला पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग देतो, असा बहाणा केला होता. मात्र तीच ओवाळणी आपल्यासाठी आयुष्य उध्वस्त करणारी ठरेल असे पीडिताला कधीही वाटलं नव्हते. 


अत्याचाराच्या व्हिडिओ केला...


रामदासला पिडीत तरुणीने आपला भाऊ मानला होता. त्यामुळे त्याच्यावर तिला पूर्ण विश्वास होता. ट्रेनिंगच्या नावाने घराबाहेर पडल्यावर रामदास याने आपल्या मित्रांच्या मदतीने तरुणीला गाडीत बसवून जेशनगरातील इमारतीत घेऊन गेला. मात्र तिथे गेल्यावर ज्या मानलेल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली, तिच्यावरच अत्याचार केला. विशेष म्हणजे अत्याचार करतानाच मोबाइलमध्ये चित्रीकरण सुद्धा केलं. तसेच ते  व्हायरल करण्याची धमकी दिली. पण पिडीत तरुणीने आपल्या मोठ्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला.