Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेच्या 'बटण गोळ्या' विक्री मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकाची स्थपना करून कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठा खुलासा झाला आहे. या गोळ्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, गुजरातमधील सुरत येथून मेडिकलमधून या गोळ्या खरेदीकरून औरंगाबाद शहरात एजंटामार्फत विक्री केली जात असल्याचे समोर आलाय. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन.डी.पी.एस. सेलचे पथकास गोपनिय माहिती मिळाली होते की, प्रतिक उर्फ पत्या मधुकर गोरे (वय.24 वर्षे रा. जाधववाडी औरंगाबाद) नावाचा व्यकी गुंगीकारक नशेच्या गोळया विक्री करत आहे. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचत एन-8 जॉगिंग ट्रैक समोरून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यात 505 नशेच्या गोळया व मोबाईल फोन असा एकूण 23, हजार 104 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तर आरीफ खॉन बशीर खान (वय 40 वर्ष रा. मालेगाव ह.मु. सावंगी ता.जि. औरंगाबाद) याच्याकडून आपण गोळ्या विकत घेतल्याचे त्याने सांगीतले.


त्यांनतर पोलिसांनी आरीफ खान याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतेले. त्याची चौकशी केली असता त्याने, आठ-दहा दिवसापूर्वी पोलीस ठाणे सिडको येथे अटक असलेला इब्राहीम शहा अकबर शहा (बापू नगर सुरत,गुजरात) याच्याकडून नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी विकत घेतल्याची माहिती दिली. तसेच विकत घेतलेल्या गोळ्याचे काही बॉक्स कटकटगेट येथील एका व्यक्तीला आणि प्रतिक मधुकर गोरे यास विकल्याची कबुली दिली. त्यामुळे याप्रकरणी प्रतिक आणि आरीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


गुजरात कनेक्शन...


आठ दिवसापूर्वी पोलीस ठाणे सिडको हद्दीत इब्राहीम शहा अकबर शहा (बापू नगर सुरत, गुजरात) याला पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी अटक केली होती. सद्या तो कारागृहात आहेत. इब्राहीम हा या गोळ्या गुजरातच्या सुरतमधील मेडिकलमधून विकत घायचा. त्यांनतर त्याच गोळ्या औरंगाबादमध्ये आणून विकायचा. आरिफ हा सुद्धा त्याच्यासाठी काम करायचा.इब्राहीमकडून घेतलेल्या गोळ्या तो आपल्या फंटरमार्फत शहरात विकायचा.